शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार गोपीचंद पडळकर यांचा परळी दौरा; श्रावण मासानिमित्त घतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 17:26 IST

गोपीचंद पडळकरांनी वैद्यनाथ मंदिरातील राजमाता पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

परळी: राज्यातील जनतेच्या, शेतकरी, विद्यार्थी, कष्टकरी,  बारा बलुतेदार यांच्या  हिताचे काम नवीन सरकारच्या माध्यमातून घडावे अशी प्रार्थना महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य, आमदार गोपीचंद पडळकर यांनी श्री प्रभू वैद्यनाथ चरणी केली. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे श्रावण मासानिमित्त रविवारी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दर्शन घेतले.

यावेळी पडळकरांनी वैद्यनाथ मंदिरातील राजमाता पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यांच्यासोबत भीमराव सातपुते, शिवदास बिडगर, कमलाकर बिडगर, सुभाष बिडकर, सतीश बिडगर सर्जेराव बिडगर, अमोल बिडगर, नारायण कुंडगीर, सुरेश बंडगर , अमोल सातपुते आणि इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रावण महिन्यानिमित्त प्रभू वैद्यनाथाचे दर्शन झाले याचा आपल्याला आनंद वाटला असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगून राज्यातील सर्वांच्या हिताचे काम नवीन सरकारच्या माध्यमातून घडावे अशी प्रार्थना प्रभू वैद्यनाथास केली असल्याची माहिती त्यांनी लोकमतला बोलताना दिली.  परळी तालुक्यातील डाबी येथील क्रांतिवीर राजे धर्माजी नाईक मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दर्शनासाठी आमदार गोपीचंद पडळकर हे रविवारी परळी दौऱ्यावर होते.

आमदार पडळकर यांनी डाबी येथे जाऊन दर्शन घेतले तसेच परळी तालुक्यातील दाऊतपुर येथील सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेतले व  चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला भेट दिली. परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील श्री  सोमेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन पडळकरांनी गोपीनाथ गड येथे जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळाचेही दर्शन घेतले. यावेळी दाऊदपूर येथील शिवदास बिडगर यांनी आमदार पडळकरांचे जोरात स्वागत करण्यात आले.

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरparli-acपरळी