शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

परळीचे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ठरले लक्षवेधी, हजारो शेतकऱ्यांच्या भेटीने परिसर फुलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 19:54 IST

रानभाज्या नवीन बी बियाणे उत्पादने ,आधुनिक शेती विषयक अवजारे, तंत्रज्ञान व पशुप्रदर्शन पाहण्यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या भेटी

- संजय खाकरेपरळी : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत भरविण्यात आलेल्या पाच दिवशीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येत आहेत. गेल्या चार दिवसापासून कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांच्या विविध स्टॉलला रांगा लागल्या आहेत. नवीन प्रकारचे बी बियाणे, शेती विषयक अत्याधुनिक अवजारे, ट्रॅक्टर. रानभाज्या, खाद्यपदार्थ स्टॉल व पशु प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

अमेरिकेचे मूळ फळपीक असलेल्या अवोकॅडोची माहिती या प्रदर्शनामध्ये दिले जात आहे. 21 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस,अजित दादा पवार , राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, महाराष्ट्र विधान परिषद सदस्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

पहिल्या दिवशी या कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला 20,000 शेतकऱ्यांनी पहिल्या दिवशी कृषी प्रदर्शन पाहून प्रदर्शनातील शेती विषयक नवीन नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली तसेच दुसऱ्या दिवशी पासून दहा हजाराच्या वर शेतकरी या प्रदर्शनासभेट देत आहेत, शनिवारी महाराष्ट्रातल्या कन्या कोपऱ्यातून शेतकरी प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते तसेच मुंबई येथूनही 50 शेतकरी आले दौनापूर येथील 85 विद्यार्थी यांनी कृषी प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली. परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थिनीनी ही कृषी प्रदर्शनास भेट दिली. शनिवारी या ठिकाणी पशु संवर्धनविषयी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. दररोज कृषी विषयी परिसंवाद व चर्चासत्र तज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे. कृषी प्रदर्शनाच्या विविध स्टॉलमध्ये शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. बी बियाणे ,अवजारे, रानभाज्या या ठिकाणच्या प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर फाउंडेशन स्कूलच्या जवळील मैदानातही भरवण्यात आलेले पशुप्रदर्शनही लक्षवेधी ठरत आहे. 

या ठिकाणी विविध जातीचे घोडे ,गायी म्हशी,कोंबडी ,शेळी ,श्वान पाहण्यासाठी ही पशुप्रेमी येत आहे. परळीच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास आम्ही भेट दिली आहे या कृषी प्रदर्शनात शेतीविषयक नवीन तंत्रज्ञानची माहिती मिळाली आहे .निश्चितच हे शिबिर शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढीसाठी उपयुक्त ठरणारे आहे. - महारुद्र महाके शिरूर ताजबंद. जिल्हा लातूर. 

कृषी प्रदर्शनासाठी राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांना जेवणाची सुविधा या ठिकाणी खाद्यपदार्थाच्या स्टॉलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे .विविध बचत गटाचे खाद्यपदार्थ स्टॉल लावण्यात आले आहे खाद्यपदार्थाच्या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळत आहे- मीरा सातभाई. वरद महिला बचत गट तडोळी. 

दररोज दहा हजाराच्या वर शेतकऱ्यांची भेट. परळीच्या कृषी प्रदर्शनास दररोज दहा हजाराच्या वर शेतकरी भेट देत येत आहेत. व या प्रदर्शनातून नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेत आहेत. - नोंदणी अधिकारी, कृषी प्रदर्शन परळी. 

रानभाज्या स्टॉलमध्ये 30 भाज्यांची माहिती प्रदर्शनास आलेल्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे या भाज्यांचा शरीर स्वास्थ्यासाठी काय फायदा आहे याची आम्ही माहिती देत आहोत. -विठ्ठल बिडगर, विव्हल मिश्रा. 

शेती विषयक 170 बी बियाणे खते व इतर नमुन्यांची माहिती प्रदर्शनात आमच्या जय किसान ऍग्रो इंडस्ट्रीजच्या स्टॉल मधून देण्यात येत आहे. -नागनाथ कांगणे, छत्रपती संभाजीनगर. 

अमेरिका ,जपान, इजराइल देशात मोठ्या प्रमाणात होत असलेली अवोकॅडो या फळ शेती ची माहिती पहिल्यांदाच परळी च्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये देण्यात येत आहे. पदवीधर कृषी फार्मच्या स्टॉलमध्ये अमेरिकेतील मूळ असेलेल्या अवोकॅडो या फळ शेती पीक लागवडीची माहिती परमेश्वर आबासाहेब थोरात शिवनी जिल्हा बीड हे कृषी प्रदर्शनात देत आहेत. आपण 2018 पासून अवोकॅडो या फळ लागवडीची शेती करतोय.फक्त पहिल्या वर्षी खर्च येतो त्यानंतर पन्नास वर्ष उत्पन्न होते. एकरी अडीच लाख रुपयांचे उत्पन्न दरवर्षी होते. -परमेश्वर आबासाहेब थोरात, शिवनी जिल्हा बीड

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र