शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

परळीत मुंडे कुटुंबांचे नाथ्रा गावात एकत्र मतदान, भाऊ- बहिणींनी मतदारांचा वाढवला उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 15:53 IST

मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना ना. पंकजा मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील जनता नेहमीच विकासाच्या बाजूने राहिली आहे, जातीपातीला त्यांनी कधीच थारा दिला नाही. बहिणीच्या

परळी:बीड लोकसभा निवडणुकीसाठी शहर व परिसरात मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह दिसून आला. सकाळी 11 पर्यंत मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक मतदान केंद्रावर मतदारांची रीघ तर काही मतदान केंद्रात तुरळक मतदार दिसून आले. शहर व परिसरात दुपारपर्यंत शांततेत मतदान चालू होते. मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभुवैद्यनाथांचे दर्शन घेऊन बीड लोकसभा निवडणूकीतील भाजप महायुतीच्या उमेदवार  पंकजा मुंडे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, खासदार डाॅ.प्रितम मुंडे यांनी  आज नाथ्रा येथे मतदानाचा हक्क बजावला. 

यावेळी त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, भगिनी यशश्री मुंडे  होत्या. यांनी प्रथम सकाळी  दक्षिणमुखी गणपती, प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर गोपीनाथ गड येथे जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि नाथ्रा येथे ग्राम दैवत पापनाशेश्वराचे दर्शन घेऊन सकाळी ११.०५ वा. जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. सकाळपासूनच वातावरणात उष्णता जाणवत होती तरीही मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करताना दिसत होते. जागोजागी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.  मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना ना. पंकजा मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील जनता नेहमीच विकासाच्या बाजूने राहिली आहे, जातीपातीला त्यांनी कधीच थारा दिला नाही. या निवडणूकीतही तेच दिसले. मतदानासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. जनतेचा आशीर्वाद मला असल्याने विजय निश्चित आहे.. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही नाथ्रा येथे आई रुक्मिणीबाई मुंडे, पत्नी राजश्री मुंडे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.

टॅग्स :beed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४