शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'प्रत्येक परीक्षेसाठी पप्पा सोडायला येत'; वैभवीने अश्रूंना केली वाट मोकळी, दु:ख झेलत दिला पेपर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 11:25 IST

दोन महिने अभ्यासापासून दुरावलेल्या वैभवीने अखेर हिमतीने बारावीची परीक्षा दिली.

केज : तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याच्या दुःखातून अद्यापही न सावरलेली त्यांची कन्या वैभवी हिने मंगळवारी बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर दिला. परीक्षा केंद्रावर वडील सोडवायला न येता दिलेली ही पहिलीच परीक्षा असल्याची प्रतिक्रिया वैभवीने ‘लोकमत’शी बोलताना दिली.

वैभवी देशमुख हिचे अहिल्यानगर जिल्ह्यातील एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात विज्ञान शाखेतून शिक्षण सुरू आहे. लातूर पॅटर्न राज्यासह देशात गाजत असल्यामुळे बारावीची तयारी वैभवी लातूर येथे करीत असताना तिचे पित्याचे छत्र हरपले. ९ डिसेंबर रोजी गुन्हेगारांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची क्रूरपणे हत्या केली. त्यामुळे बारावी बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या वैभवीवर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन महिने अभ्यासापासून दुरावलेल्या वैभवीने अखेर हिमतीने बारावीची परीक्षा दिली.

अश्रूंना केली वाट मोकळीआमच्या प्रतिनिधीने मंगळवारी सायंकाळी ७ वाजता मस्साजोग येथे जाऊन वैभवीची भेट घेत तिची प्रतिक्रिया जाणून घेतली. डोळ्यांमध्ये भरून आलेल्या अश्रूंना वाट करून देत प्रत्येक परीक्षेसाठी पप्पा मला सोडवायला परीक्षा हॉलपर्यंत यायचे; परंतु आज बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पित्याची उणीव प्रकर्षाने व तीव्रतेने जाणवली. दोन महिन्यांपासून आमच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे अभ्यासात मन लागत नव्हते. तरीही मी आत्मविश्वासाने बारावीच्या परीक्षेला सामोरे जात १२ वीच्या परीक्षेचा पहिला पेपर छान सोडविल्याची भावना वैभवी देशमुख हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

२७ तारखेला परीक्षा संपणार११ फेब्रुवारी रोजी सुरू झालेली परीक्षा २७ फेब्रुवारी रोजी संपणार असून, परीक्षेच्या दिवशी काका धनंजय देशमुख परीक्षा केंद्रावर पोहोचवायला आल्याचे वैभवीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण