शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी दिलेल्या दुःखाची व्याजासह परतफेड करू : पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 16:30 IST

पुढच्या वेळेस सुद्धा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री

गोपीनाथ गड (बीड ) : जातीपातीचे गलिच्छ राजकारण करून सर्वाना दुख: देणाऱ्या विरोधकांना याची व्याजासह परतफेड करू असा इशारा एक उर्दू शेर सादर करून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गड येथे विरोधकांना दिला. यासोबतच मतदारांनी जातीपातीचे राजकारण मोडीत काढले असून पुढच्या वेळेस महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील असा विश्वाससुद्धा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.  

परळी, तालुक्यातील पांगरी येथील गोपिनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनी समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी आज सकाळपासूनच चाहत्यांची गर्दी झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गोपीनाथगडावर रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्यातील युतीच्या खासदारांचे स्वागत केले. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांचे नाव जगाला विसरू देणार नाही. सामान्यांची वंचितांची सतत मदत करत राहणार. गोपीनाथ गड हा सर्वांना उर्जा देत आहे, सर्वांचे प्रेरणास्थान बनला आहे असेही त्या म्हणाल्या. 

पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री गलिच्छ राजकारण करून आम्हाला विनाकारण दु: ख देण्यात आले. घरात त्रास झाला, बाहेर त्रास झाला,जिल्ह्यात त्रास झाला. मात्र जनतेने जातीपातीच्या गलिच्छ राजकरणाला थारा दिला नाही. आता सर्व सामान्यांच्या सोबतीने दु: ख देणाऱ्यांना व्याजासह याची परतफेड करू असा इशारा मुंडे यांनी दिला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच नंतरही मुख्यमंत्री होतील. यासाठी माझा खारीचा वाटा असेल अशी ग्वाही सुद्धा मुंडे यांनी दिली.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस