शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

'अकबर रोडवरून जाताना आक्रोश करावासा वाटतो', गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींने पंकजा भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 13:50 IST

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी येथील गोपीनाथ गडावर अभिवादानासाठी आज सकाळपासून अनुयायांची गर्दी झाली आहे.

परळी ( बीड) : दिल्ली येथील अकबर रोडवरून जाताना लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने मन व्याकूळ होते, आक्रोश करावासा वाटतो पण त्यांनी दिलेल्या रडायचे नाही लढायचे या शिकवणीमुळे मी पुढे जाते, अशा शब्दात माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर भावना व्यक्त केल्या.  लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी येथील गोपीनाथ गडावर अभिवादानासाठी आज सकाळपासून अनुयायांची गर्दी झाली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील गोपीनाथ गडावर येण्याऐवजी सर्वांनी आपापल्या परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून गोपीनाथ गड गांवागांवात पोहोचवावा असं आवाहन केले होते. तसेच राज्यात घडलेल्या अप्रिय घटनांबद्दल गोपीनाथ गडावर अर्ध्या तासाचं मौन बाळगण्यात आले. राज्यातील जवळपास साडेपाचशे ठिकाणी देखील कार्यकर्त्यांनी मौन बाळगले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने भावूक झाल्या. दिल्लीत अकबर रोडवरून जाताना वडिलांच्या आठवणीत थांबावे वाटते, आक्रोश करावा वाटतो. शेवटच्या काळात त्यांची काय अवस्था असेल याचा विचार करून मनसुन्न होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर गर्दी केली. त्यामुळे दु:ख आवरून माईक हातात घ्यावा लागला. त्यानंतर रडायचे नाही लढायचे ही मुंडे यांची शिकवणी अंगिकारली.

...याचा मला राग येतो आतापर्यंत कधीच अभद्र बोलले नाही कोणा विषयी नाही. शत्रू विषयी नाही. मला खूप घाबरतात सगळे, दरारा आहे. प्रेम करता म्हणून लोक तत्व मोडीत काढतात तेव्हा मला राग येतो. मला काही तरी मिळवायचं म्हणून मी कुणासमोर जाणार नाही. मला जे मिळवायाचं ते मी मिळवलं. मला जिथे जायचं तिथे तुम्ही या, हे मी राजकारणात मिळवलं. मी थकणार नाही. मी थांबणार नाही. कोणासमोर कधी झुकणार नाही. काही लोक पदासाठी लोकांच्या पुढे-पुढे करतात. पण माझ्या रक्तात ते नाही. कालही नव्हतं आजही नाही, मी ऊतणार नाही. मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, असंही पंकजा म्हणाल्या.

हा सुद्धा महापुरुषांचा अवमानमहापुरुषांपासून प्रेरणा घेऊन बोलायचं असतं. जर एखादा व्यक्ती चांगल्या भावनेनं बोलतो, पण जर एखादा शब्द खाली वर झाला तर त्याची आपण वाट पाहतो, आणि त्यावरून बोभाटा करतो हा सुद्धा महापुरुषांचा अवमान करणेच आहे. त्या व्यक्तीच्या भावना पोहोचल्याच नाही, हा सुद्धा महापुरुषांचा अवमान आहे. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीडGopinath Mundeगोपीनाथ मुंडे