शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

पंकजा मुंडेंची मैदानावरही फटकेबाजी, पहिल्याच चेंडूवर लगावला 'षटकार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 10:47 IST

परळी तहसील कार्यालयासमोरील मैदानात शुक्रवारपासून सीएम चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली.

बीड - सीएम चषक क्रिकेट स्पर्धेअंतर्गत राज्यभर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धांमुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला आहे. त्यातच, शुक्रवारी परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते सीएम चषख स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यावेळी, पंकजा यांनी आर. टी. देशमुख यांच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला. तर आमदार लक्ष्मण पवार यांना क्‍लीन बोल्ड केले. पंकजा यांची ही अष्टपैलू खेळी पाहून सर्वचजण अचंबित झाले होते.  

परळी तहसील कार्यालयासमोरील मैदानात शुक्रवारपासून सीएम चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेच्या उद्घाटनानंतर पंकजा मुंडे यांनी बॅटींग आणि बॉलिंगद्वारे खेळाचा आनंद घेतला. नेहमीच राजकीय मैदानावर फटकेबाजी करणाऱ्या पंकजा यांची ही खेळी पाहून कार्यकर्तेही अवाक झाले.  आमदार आर. टी. देशमुख यांनी गोलंदाजी करण्यासाठी बॉल हाती घेतला. त्यांनी नेहमीप्रमाणे सहजच बॉल टाकला आणि पंकजा मुंडेंनी उत्तुंग षटकार ठोकला. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून आपण राजकीयच नाही, तर क्रिकेटच्या मैदानावरही उत्कृष्ट खेळाडू असल्याचं पंकजा यांनी दाखवून दिलें. पंकजा यांचा हा षटकार पाहून उपस्थित नेते अन् कार्यकर्त्यांनी टाळ्या-शिट्ट्या वाजवल्या. 

आगामी काळात शहरात भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा आपला मानस असून त्यासाठी निधी बरोबरच जागाही उपलब्ध करून देवू अशी ग्वाही यावेळी पंकजा यांनी दिली. भाजपने राज्यभर आयोजित केलेल्या सीएम चषक स्पर्धांमुळे युवकांना प्रोत्साहन मिळत आहे. या अगोदरही शहरात गौरी गणेश महोत्सव, टर्निंग पाँईंटच्या वतीने आपण महिला, युवक व शालेय विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना वाव देणारे कार्यक्रम हाती घेतले होते. आता, मैदानी स्पर्धा यानिमित्ताने घेण्यात येत आहेत. शहरात क्रीडा स्पर्धेसाठी चांगले वातावरण तयार होत आहे, त्याला अधिक वाव देण्यासाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा माझा विचार आहे, त्यासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्नही आपण सोडवू, असे आश्वासन पंकजा यांनी परळीकरांना दिले.

 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड