शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

'दसऱ्याच्या तयारीला लागा, भगवान भक्तीगडावर भेटू', पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 15:30 IST

पंकजा मुंडे यांनी व्हिडिओद्वारे दसरा मेळाव्यासाठी सर्व भाजप समर्थकांना येण्याचे आवाहन केले आहे.

परळी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरुन जोरदार वाद सुरू होता. शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये शिवाजी पार्कावर दसरा मेळावा घेण्याचा वाद कोर्टात गेला. अखेर कोर्टाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासोबतच बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याचीही जोरदार चर्चा असते. 

कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून मुंडेंचा दसरा मेळावा अतिशय साध्या पद्धतीने झाला होता. मात्र यावर्षी परवानगी मिळाल्याने हा मेळावा मोठ्या प्रमाणात हा मेळावा साजरा केला जाणारा आहे. त्याच अनुषंगाने संत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव मध्ये मेळाव्याची मोठी तयारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी या तयारीचा एक व्हिडिओही शेअर केला होता. 21 सप्टेंबर रोजी शेअर केलेल्या व्हिडिओसोबत पंकजा मुंडे म्हणाल्या होता, 'कोरोनामुळे अधूरे राहिलेले काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्या दिवसाच्या प्रतिक्षेत...तो दिवस आपला...एक अनोखा दिवस...कोणता दिवस, कोणते स्थळ, आणि निमित्त काय ???..तुम्हाला तर माहीत आहेच...लागा तयारी ला,' असे आव्हान पंकजा मुंडेंनी केले होते. दरम्यान, आजही पंकजा मुंडे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ पोस्ट करुन मेळाव्या संदर्भात आपल्या समर्थकांना खास आवाहन केले आहे. व्हिडिओमध्ये सुरुवातीला पंकजा मुंडे नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच, दसरा म्हणजे, आपल्या स्वाभिमानाचा दिवस, आपल्या आवडीचा दिवस, आपल्या सर्वांच्या शक्ती आणि भक्तीच्या संगमाचा दिवस. आपण सर्वांनी दसऱ्याच्या तयारीला लागा आणि दसऱ्याच्या दिवशी मेळाव्यात भेटूया, असे आव्हानही केले.

विशेष म्हणजे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे हयात असताना दसरा मेळावा भगवान गडावर व्हायचा. पण, त्यांच्या निधनानंतर भगवानगडाचा वापर राजकारणासाठी नको अशी भूमिका घेत पंकजांच्या मेळाव्याला विरोध करण्यात आला होता. तेव्हापासून हा मेळावा सावरगावच्या भगवान भक्तीगडावर घेतला जातो. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDasaraदसराBeedबीड