शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती महिलेचा दुर्दैवी अंत; शेतातून घरी परतत असताना वीज कोसळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 14:07 IST

बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊसाचा फटका 

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात वीज पडून दोन महिला ठार झाल्या आहेत वीज पडून पाच जनावरांचा मृत्यूसुद्धा झाला आहे

बीड : जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दोन विविध ठिकाणी वीज पडून दोन महिला जागीच ठार झाल्या. यात एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. तर सहा जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. केज तालुक्यात दोन दिवसात चार ठिकाणी वीज पडल्याची घटना घडली.

बीड तालुक्यातील नेकनूरच्या लोखंडे वस्तीवरील राधाबाई दीपक लोखंडे (२०) ही महिला दुपारी शेतात काम करीत होती. पाऊस सुरू झाल्याने ती घराकडे परतत असताना तिच्यावर वीज कोसळली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर राधाबाईच्या समोर असणाऱ्या त्यांच्या सासू जखमी झाल्या. मयत राधाबाई या आठ महिन्यांच्या गर्भवती आहेत.

दुसरी घटना केज तालुक्यात पिटीघाट येथे घडली. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास येथील महिला गीताबाई जगन्नाथ ठोंबरे (वय ४५) या शेतात काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आष्टी, अंबाजोगाई, धारूर परिसरात शनिवारी झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.

मंदिर, घरावर वीज कोसळलीकेज तालुक्यात शनिवारी बेंगळवाडी येथील एका मंदिरावर वीज पडून मंदिराचे नुकसान झाले. तर दुपारी चंदन सावरगाव येथील तुकाराम साहेबराव तपसे यांच्या शेतातील घरावर वीज पडली, परंतु घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली. यामुळे घराला आग लागून येथे ठेवलेले सोयाबीन, हरभरा, गहू धान्य, पाईप, मोटारसायकलसह कडबा गंजी खाक झाली. यात शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीमुळे पूर्ण वस्तीलाच आग लागली होती. परंतु अग्निशमन दलाने आग शमविल्याने नुकसान टळले.

पाच जनावरे ठारनेकनूरजवळील सानपवाडी शिवारात रविवारी वीज पडून बाबासाहेब नामदेव गित्ते यांच्या मालकीचे दोन बैल ठार झाले तर अंबाजोगाई शहरातील मेंढी फार्मजवळ चांदमारी परिसरात वीज कोसळून आजीम खान यांच्या मालकीच्या दोन गायी आणि एक शेळी दगावल्याची घटना घडली.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यूRainपाऊस