शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

आमचे पप्पा जगात राहिले नाहीत, आता तरी आरोपींना पकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 18:07 IST

मारहाणीतील जखमीचा मृत्यू झाल्याने कुटुंबाचा पोलिसांवर रोष, एसपी कार्यालयासमोर दिला ठिय्या

बीड : आमचे पप्पा गावी एकटेच राहायचे, त्यांच्यावर हल्ला झाला, नंतर अपघात भासवला. महिन्यापूर्वी गुन्हा नोंद केलेला आहे; पण पोलीस आरोपींना शोधण्याऐवजी आम्हालाच पुरावे मागत आहेत. पप्पा आज जगात नाहीत, त्यांना जिवंतपणी न्याय मिळाला नाही; परंतु आता तरी आरोपींना अटक करा, अशा शब्दांत भावंडांनी पोलिसांबद्दल रोष व्यक्त केला. कुप्पा (ता. वडवणी) येथील एका शेतकऱ्यावर महिन्यापूर्वी सख्ख्या भावाने जमिनीच्या वादातून हल्ला केला होता. उपचारादरम्यान, १५ जानेवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर कुटुंबीयांनी शवविच्छेदन रोखून धरत पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला.

संभाजी कारभारी वडचकर (५२, रा. कुप्पा, ता. वडवणी) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची मुलगी प्रीती संभाजी वडचकर यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील व काका प्रकाश कारभारी वडचकर यांच्याशी जमिनीचा वाद होता. १३ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास वडील संभाजी वडचकर यांना शेतीचा व विहिरीचा मालकी हिस्सा मागण्याच्या कारणावरून प्रकाश वडचकर, आकाश वडचकर, वसंत सावंत व महादेव सावंत (सर्व रा. कुप्पा) यांनी संगनमत करून जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयता व कुऱ्हाडीने डोके आणि चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर अपघात भासविण्यासाठी दुचाकीवरून तेलगाव रोडला दुचाकीवरून जखमी स्थितीत आणून टाकले होते. तेथून त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून बीडला खासगी रुग्णालयात दाखल केले. 

दरम्यान, प्रीती यांच्या तक्रारीवरून वडवणी ठाण्यात या चौघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. संभाजी वडचकर यांची प्रकृती खालावत गेली. १५ जानेवारी रोजी पहाटे उपचारादरम्यान खासगी दवाखान्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, महिनाभरात पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे वडवणी पोलिसांबद्दल नातेवाइकांनी रोष व्यक्त केला. शिवाय तपास उपनिरीक्षक जय परदेशी यांच्याकडून काढून सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे देण्याची मागणी करण्यात आली.

लेखी आश्वासनानंतर माघारउपअधीक्षक संतोष वाळके यांनी मयत संभाजी वडचकर यांचा मुलगा श्रीशैल्य, मुली कीर्ती, प्रीती व ज्योती यांची समजूत काढली. आरोपींना अटक करण्यासह योग्य तो तपास करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर वडचकर कुटुंबीयांनी ठिय्या मागे घेतला. वडवणी पोलिसांनी धाव घेतली, त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीला सुरुवात झाली. रविवारी उशिरा पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

न्यायालयाला पत्र देणारसंभाजी  वडचकर यांचा मृत्यू झाल्याने गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात येणार आहे. न्यायालयाला तसे पत्र पाठविण्यात येईल. न्यायालयाच्या परवानगीने पुढील कार्यवाही केली जाईल. आरोपींचा तपास सुरु आहे. - जय परदेशी, उपनिरीक्षक, वडवणी 

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू