शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कोळगावच्या पेयजल योजनेची मूळ संचिका गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:42 IST

गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतील मोठे गौडबंगाल झाल्याचे समोर येत आहे. पाणीपुरवठा विभागाने मुळ संचिकाच गहाळ केल्याने संशय व्यक्त केला जात आहे

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतील मोठे गौडबंगाल झाल्याचे समोर येत आहे. पाणीपुरवठा विभागाने मुळ संचिकाच गहाळ केल्याने संशय व्यक्त केला जात आहे. शिवाय येथील कार्यकारी अभियंत्यांनी महत्वाची संचिका गहाळ झाल्यानंतरही पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देण्याऐवजी केवळ पोस्टाने तक्रार पाठवून हात झटकले आहेत. त्यामुळे ही योजना आणि यातील निधीमध्ये मोठा घोटाळा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पेयजल कार्यक्रमांतर्गत कोळगावला ९० लाख ९७ हजार ९५० रूपयांचा निधी मंजूर झाला. त्यामध्ये एक विहीर खोदली. तिला पाणी लागलेले नसतानाही पाईपलाईन केली. काम बोगस करून २०११ मध्ये कार्यरत संबंधित अधिकारी आणि समितीचे अध्यक्ष, सचिवाने २४ लाख रूपयांचा पहिला हप्ता घेतला. या कामाची माजी सरपंच उद्धव रासकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे तक्रार केली. याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले, मात्र चौकशी झाली नसल्याचे रासकर यांचे म्हणणे आहे. गत ९ वर्षांपासून अद्यापही या योजनेचा निकाल लागलेला नसून यासंदर्भात अनेक तक्रारी पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, या योजनेचा १४ लाख रूपयांचा दुसरा हप्ता वर्ग करावयाचा आहे. मात्र, यामध्ये मोठा घोटाळा असल्याचे समोर येऊ नये, यासाठी संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांनी ही मुळ संचिकाच गहाळ करून टाकली आहे. यामध्ये सर्व तक्रारी आणि पुरावे असल्याचे सांगण्यात येते. धनादेशास आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती स्वत:च्या ताब्यात ठेवल्याचा आरोप रासकर यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे.संचिका गहाळ झाल्याचे समजताच संबंधित कर्मचारी, अधिका-यांची कार्यालयीन पातळीवर चौकशी करणे अपेक्षित होते. मात्र कसलीही चौकशी न करता थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शासकीय दस्ताऐवज गहाळ झाल्यास पोलीस ठाण्यात फिर्याद देणे अपेक्षित आहे. त्यात कधी व कोठून हरवली, याचा उल्लेखही असणे आवश्यक होते. मात्र कार्यकारी अभियंत्यांकडून ठाण्यात आलेल्या पत्रात असे काहीच नमूद केलेले नसल्याचे सांगण्यात आले. यावरून हा सर्व खटाटोप केवळ १४ लाख रूपयांचा दुसरा हप्ता हडप करण्यासाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे. याची चौकशी करण्याची मागणीही माजी सरपंच उद्धव रासकर यांनी केली आहे.चौकशी न करता ठाण्यात तक्रार कशी?ज्या विभागातून संचिका गहाळ झाली, संबंधित कर्मचारी कोण, कधी गहाळ झाली, याला जबाबदार कोण, यासंदर्भात कार्यालयीन चौकशी करणे अपेक्षित असते. मात्र वरिष्ठांनी असे काहीच करता संबंधिताला पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Waterपाणीgovernment schemeसरकारी योजनाCrime Newsगुन्हेगारी