शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

होमिओपॅथिक डॉक्टरांना आधुनिक उपचारांच्या परवानगी विरोधात आयएमएचा उद्या राज्यव्यापी संप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 20:08 IST

महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर्स एक दिवसाचा संप करणार असून, याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.

बीड: महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकामुळे 'इंडियन मेडिकल असोसिएशन' आक्रमक झाली आहे. 'सीसीएमपी' कोर्स उत्तीर्ण झालेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, ज्याच्या विरोधात १८ सप्टेंबर रोजी राज्यभरातील सर्व एमबीबीएस डॉक्टर लाक्षणिक संप पुकारणार आहेत.

आयएमएने या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, यामुळे आरोग्य सेवेच्या गुणवत्तेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. एमबीबीएस अभ्यासक्रम हा ५.५ वर्षांचा असून त्यात १९ विषयांचा सखोल अभ्यास, क्लिनिकल अनुभव आणि एक वर्षाची इंटर्नशिप असते. याउलट, सीसीएमपी हा केवळ एक वर्षाचा कोर्स असून, आठवड्यातून फक्त दोन दिवस शिकवला जातो. अशा अपूर्ण प्रशिक्षणाने आधुनिक वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये विकसित होऊ शकत नाहीत. बीड आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनंत मुळे आणि सचिव डॉ. अमोल गीते यांनी या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर्स एक दिवसाचा संप करणार असून, याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.

रुग्ण सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हअपूर्ण प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींकडून उपचार झाल्यास चुकीचे निदान, दुष्परिणाम, अँटीबायोटिक रेसिस्टन्स आणि रुग्णाच्या मृत्यूची शक्यता वाढू शकते, अशी भीती आयएमएने व्यक्त केली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि राज्य वैद्यकीय परिषदांच्या नियमांनुसार, आधुनिक औषधोपचाराचा परवाना फक्त एमबीबीएस आणि त्यानंतरच्या पात्रतेसाठी आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरBeedबीड