शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीड पासपोर्ट केंद्रात पहिल्या २५ जणांची आॅनलाईन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:18 IST

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मंजूर झालेल्या व येत्या आठवड्यात सुरु होणाऱ्या येथील पोस्ट आॅफीस पासपोर्ट सेवा केंद्रात २९ मार्चसाठी २५ जणांची नोंदणी कन्फर्म झाली आहे. आता पासपोर्टची वेबसाईट २६ मार्च रोजी दुपारी सुरु होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मंजूर झालेल्या व येत्या आठवड्यात सुरु होणाऱ्या येथील पोस्ट आॅफीस पासपोर्ट सेवा केंद्रात २९ मार्चसाठी २५ जणांची नोंदणी कन्फर्म झाली आहे. आता पासपोर्टची वेबसाईट २६ मार्च रोजी दुपारी सुरु होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बीड येथे पासपोर्ट कार्यालय व्हावे म्हणून मागील तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरु होता. हे कार्यालय सुरु करण्यासाठी जागेची विचारणा झाल्यानंतर टपाल विभागाने जागा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी पाठपुरावा करत बीड सेवाकेंद्रासह इतर ठिकाणचेही प्रश्न मार्गी लावले. २९ मार्च रोजी बीड येथे या सेवाकेंद्राचे कामकाज सुरु होत आहे. त्याअनुषंगाने २५ अर्जदारांनी शासनाच्या पासपोर्ट इंडिया. गव्ह. इन या संकेतस्थळावर लॉगिन आयडी प्राप्त करुन कॅटेगरीनुसार आॅनलाईन अर्ज व त्याचे शुल्क भरले. त्यांच्यासाठी २९ तारीख तसेच वेळ निश्चित केली आहे.

मात्र तत्काळ पासपोर्ट साठी सोलापूर व पुणे येथील पासपोर्ट सेवा केंद्रांवरच जावे लागणार आहे. आवश्यक कागदपत्रांसह ३ हजार ५०० रुपये शुल्क भरल्यानंतर एका दिवसात हे पासपोर्ट मिळण्याची सुविधा आहे.बीड येथील पासपोर्ट सेवा केंद्रात २ समन्वयक तसेच ६ अधिकारी, कर्मचारी कार्यरत राहतील. एका दिवशी २५ जणांचा कोटा असेल अशी शक्यता आहे. पासपोर्ट सेवाकेंद्र सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी २५ नोंदणीकृत अर्जदारांची तीन टप्प्यात चौकशी व तपासणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

 

टॅग्स :Beedबीडpassportपासपोर्टMarathwadaमराठवाडाPritam Mundeप्रीतम मुंडे