शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाकडून लाच घेणाऱ्या सहायक फौजदाराला एक वर्ष सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 00:20 IST

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणात पत्नी व मुलांची नावे वगळण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी आपल्याच ठाण्यात कार्यरत बीट अंमलदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षकाला एक वर्ष सक्त मजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रमुख सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या न्यायालयाने सुनावली.

ठळक मुद्देपाच हजार रुपये दंड : प्रमुख सत्र न्यायाधीशांनी सुनावली शिक्षा

बीड : पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणात पत्नी व मुलांची नावे वगळण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी आपल्याच ठाण्यात कार्यरत बीट अंमलदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षकाला एक वर्ष सक्त मजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रमुख सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या न्यायालयाने सुनावली.अंभोरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कैलास भाऊराव थोरवे यांच्यासह पत्नी व मुलावर एन.सी. दाखल झाली होती. या प्रकरणात पत्नी आणि मुलांची नावे वगळण्यासाठी तसेच प्रतिबंधक कारवाई टाळण्यासाठी याच पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास ढोले याने ५ हजार रुपयांची लाच मागितली. सदर लाच देण्याची मानसिकता नसल्याने या प्रकरणी कैलास थोरवे यांनी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात ढोले याच्याविरूध्द १० आॅक्टोबर २०१२ मध्ये तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लाचेची पडताळणी करून आष्टी तालुक्यातील धानोरा बस स्टॉपवर ११ आॅक्टोबर २०१२ रोजी सापळा रचला. धानोरा येथील एका चहाच्या टपरीवर ४ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात कलम ७, १३(१), (ड) प्रमाणे गुन्हा दाखल होऊन दोषारोपपत्र बीड येथील प्रमुख सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांची मंजुरी घेऊन पंच सचिन जोगदंड, तक्रारदार कैलास थोरवे, तपासी अधिकारी सुरेश चाटे यांच्या साक्षी नोंदविल्या. या साक्षी पुराव्यावरून आरोपी विलास ढोले यास दोषी धरून एक वर्षे सक्तमजूरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अ‍ॅड. मिलींद वाघीरकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCourtन्यायालय