शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जा प्रकल्पातील भीषण स्फोटात एक कामगार ठार, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 10:58 IST

सौरऊर्जा प्रकल्पात बिघाड दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन एक कामगार ठार तर दोघे गंभीर जखमी झाले.

माजलगाव: धारूर तालुक्यातील चाटगाव येथील एका सौरऊर्जा प्रकल्पात बिघाड दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन एक कामगार ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास झाला. जखमी झालेल्या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. धारूर तालुक्यात चाटगाव येथे ‘तुल्य तुलाई सोलार प्रोजेक्ट’ नामक सौरऊर्जा प्रकल्प आहे. शुक्रवारी पहाटे या प्रकल्पात अचानक बिघाड झाला. त्यामुळे जयराज जया बालन (वय २७), रामानंद रामरतन खारवाल (वय २३) आणि संपत कमलाकर शिंदे (वय २३, रा. सिरसाळा) हे तिघे कामगार दुरुस्ती करण्यासाठी तिथे गेले होते.दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात जयराज बालन १०० टक्के तर इतर दोघे ५० टक्के भाजले गंभीर भाजले. त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले असता तिथे उपचारादरम्यान जयराज बालन याचा मृत्यू झाला. तर शिंदे आणि खारवाल यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे. दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही.