शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:36 IST

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मतदारसंघातील शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून मतदारसंघातील शेतक-यांना सिंचनाकडे घेऊन जाणार असल्याचे प्रतिपादन आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी केले.

ठळक मुद्देसंगीता ठोंबरे : धनेगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकास कामांना प्रारंभ

केज : शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मतदारसंघातील शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून मतदारसंघातील शेतक-यांना सिंचनाकडे घेऊन जाणार असल्याचे प्रतिपादन आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी केले.तालुक्यातील धनेगाव येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत होळ ते इस्थळ, इस्थळ ते धनेगाव, धनेगाव ते धनेगाव फाटा, रामा ते बोरगाव, भोपला या रस्त्यांसह वरपगाव येथील तीन कोटी रुपयांच्या पुलासह केज मतदारसंघातील बावीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना सोमवारी प्रारंभ झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण सभापती संतोष हंगे होते. यावेळी गटनेते हारु ण इनामदार, पंजाब देशमुख, दत्ता धस, किशोर थोरात, बप्पा डोंगरे, अशोक काकडे, तुकाराम गोरे, दिलीप भिसे ,सुधीर रानमारे, सदाशिव चाटे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.आ. ठोंबरे म्हणाल्या, उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी मांजरात आणण्यासाठीच्या सर्वेक्षणासाठी पंधरा कोटी रु पये मंजूर झाले असून त्याचे सर्वेक्षण सुरु आहे. मतदारसंघातील शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणण्यासाठी आपण पाठपुरावा करत असून शंभर टक्के शेती सिंचनाखाली आल्यानंतर शेतकरी आर्थिक सक्षम होतील असे त्या म्हणाल्या.यावेळी समाज कल्याण सभापती संतोष हांगे, हारु न इनामदार यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :BeedबीडSangeeta Thombareसंगीता ठोंबरेIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प