जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता आता कमी झाली आहे. मृत्यूचा आकडाही दोन दिवसांत घटला आहे. रविवारच्या अहवालानुसार एकूण चार हजार ७९१ संशयितांची कोरोना तपासणी केली गेली. यामध्ये, चार हजार २८२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला; तर ५०९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील ३१, आष्टी तालुक्यात १०२, बीड तालुक्यात १२१, धारूर तालुक्यात १७, गेवराई तालुक्यात ४८, केजमध्ये ५४, माजलगावात ३७, परळीत ८, पाटोद्यात ३८, शिरूरमध्ये ३२ आणि वडवणीत २१ नवे रुग्ण आढळून आले.
दरम्यान, माजलगाव तालुक्यातील आडगाव येथील ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला; तर, दिवसभरात ६४१ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८६ हजार ५५ झाली आहे; तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७९ हजार १६३ इतकी झाली आहे. आतापर्यंत १९५३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. चार हजार ९३९ जण उपचाराखाली आहेत.