शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव स्वीटमार्ट तोडफोड प्रकरणात एक आरोपी अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 17:28 IST

शहरात दोन दिवसांपूर्वी स्वीटमार्ट तोडफोड प्रकरणातील एका आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्देशनिवारी रात्री आंबेडकर चौक व ठक्कर बाजार येथे दोन स्वीटमार्टवर दहा ते बारा युवकांनी हल्ला केला होता.या अटकेची माहिती देताना पोलिसांना पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे यांनी सांगितले कि, या प्रकरणात दोन मुख्य आरोपी आहेत.

माजलगाव (बीड) : शहरात दोन दिवसांपूर्वी स्वीटमार्ट तोडफोड प्रकरणातील एका आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

शनिवारी रात्री आंबेडकर चौक व ठक्कर बाजार येथे दोन स्वीटमार्टवर दहा ते बारा युवकांनी हल्ला केला होता. यात दुकानाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. तसेच दोघाजणांना गंभीर दुखापत देखील झाली होती. या प्रकरणी सोमवारी व्यापा-यांनी व राजकीय पक्षांनी आरोपींच्या त्वरित अटकेच्या मागणीसाठी शहर बंद ठेवले होते. यानंतर आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान काल याप्रकरणात एका आरोपीच्या सहभागाची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी रात्री उशिरा एका आरोपीला फुलेनगर येथून अटक केली. त्याने गुन्हाची कबुली दिली असून पोलीस इतर आरोपींच्या शोधात आहेत.

मित्राने दिली माहिती घटनेच्या वेळी अटक झालेल्या आरोपीचा मित्र घटनास्थळा जवळच होता. त्याने आरोपीस तेथून वेगाने पळत जाताना पाहिले होते. पळताना त्याच्या तोंडावरील कपडा बाजूला झाल्याने त्याला आरोपीची ओळख पटली. आरोपीने केलेलं कृत्य चुकीचे असल्याने सदसदविवेकबुद्धीने विचार करत त्याने पोलिसांना याची माहिती दिली. हाच धागा पकडत पोलिसांनी कारवाई केली.

दोन मुख्य सूत्रधार या अटकेची माहिती देताना पोलिसांना पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे यांनी सांगितले कि, या प्रकरणात दोन मुख्य आरोपी आहेत. अटकेतील आरोपीच्या माहितीवरून आम्ही त्यांच्या मागावर आहोत. पुढील दोन दिवसात सर्व आरोपी ताब्यात घेऊ. आरोपीला पकडण्यात पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे यांच्या सह ए. यस. आय. सुभाष शेटे, विजय घोडके, विनायक अंकुशे, किशोर राऊत , अमोल सोनवणे आदींचा समावेश होता.

टॅग्स :Beedबीड