शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुलांनी टाकून दिलेल्या वृद्ध आईला हवाय आधार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 05:48 IST

लोकमतने याचे वृत्त दिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.

सोमनाथ खताळ बीड : पोटच्या तीन मुलांनी उपचारांच्या नावाखाली ८० वर्षीय आईला जिल्हा रूग्णालयात सोडून दिल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड करताच सामाजिक कार्यकर्त्यांनी मुलांचा शोध घेतला परंतु त्यांची माहिती मिळाली नाही. या आईला आता माणुसकीचा आधार हवा आहे.सामाजिक कार्यकर्त्यांनी सोनाबाई (नाव बदलले आहे) यांना वृद्धाश्रमात पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सोनाबाई यांचा एक मुलगा शिक्षक, दुसरा सुरक्षारक्षक तर तिसरा टेलरिंगचे करतो. मात्र, तिघांच्या वादात सोनाबाई यांच्यावर अनाथ होण्याची वेळ आली. तिघांनीही आईला सांभाळण्यास असमर्थता दाखविली. त्या आजारी असल्याचे सांगत वारंवार जिल्हा रूग्णालयात दाखल केले.

लोकमतने याचे वृत्त दिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ रूग्णालयात धाव घेत त्यांची विचारपूस केली. मात्र, त्यांना ऐकायला येत नसल्याने त्यांच्याकडून नीट माहिती मिळाली नाही. त्यांना रुग्णालयात दाखल करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. मात्र तोही बंद असल्याने कार्यकर्तेही हतबल झाले. सामाजिक कायकर्ते तत्वशील कांबळे, अशोक तांगडे यांनी भेट दिली तेव्हा त्यांची एक सून तेथे होती. आपणच त्यांना सांभाळत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र परिचारिकांनी त्या पहिल्यांदाच रूग्णालयात आल्याचे सांगितले. त्यावरून सून खोटे बोलत असल्याचे उघड झाले. आपल्या पतीसह इतर दोघांचा संपर्क क्रमांक देण्यास त्यांनी नकार दिला.न्यायालयातही दावासोनाबाई यांनी काही वर्षांपूर्वी मुले सांभाळत नसल्याने न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर सर्वांनीच पैसे देण्यासह सांभाळ करू, असे न्यायालयाला लेखी दिले होते. सुरूवातीचे दोन वर्षे सर्वांनी पैसे दिले. मात्र, दहा वर्षांपासून त्यांना कसलाच आधार नाही. न्यायालयाचे हे प्रकरण त्यांच्याच एका सुनेने सांगितले.

टॅग्स :Beedबीड