शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे! लाचेचे ५ हजार रुपये पोलिसाने टाकले तोंडात, एसीबीने नाक दाबून तोंड उघडले

By सोमनाथ खताळ | Updated: May 22, 2024 16:16 IST

बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलिस ठाण्यातील हवालदाराचा कारनामा

बीड : शेतीच्या वादातून झालेल्या भांडणामध्ये चकलांबा पोलिस ठाण्यात परस्पर तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हे नोंद झाले. यामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी चकलांबा पोलिस ठाण्यातील हवालदाराने पाच हजार रुपयांची लाच घेतली. त्याला पकडताच घेतलेले पाच हजार रुपये त्याने ताेंडात टाकले. चावून ते गिळण्याआधीच एसीबीच्या पथकाने पकडले. नाक दाबून तोंड उघडत त्याच्या तोंडातील रोख पाच हजार रुपये काढून जप्त केले. ही कारवाई मंगळवारी दुपारी छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले.

मारुती रघुनाथ केदार (वय ३४, रा. चकलांबा, ता. गेवराई) असे कारवाई झालेल्या हवालदाराचे नाव आहे. केदार हा चकलांबा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. तक्रारदार व त्यांचे चुलते यांच्यात शेतीच्या वादातून भांडण झाले होते. याप्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यामध्ये प्रतिबंधक कारवाईमध्ये मदत करण्यासाठी हवालदार केदार याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मंगळवारी सकाळीच संबंधिताने छत्रपती संभाजीनगरच्या पथकाकडे तक्रार केली. लगेच पथक चकलांबा येथे आले. खात्री करून पाच हजार रुपयांची लाच घेताच केदार याला पकडले. त्याच्याविरोधात चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजयमाला चव्हाण, अमोल धस यांच्यासह पोह.सिंदकर, युवराज हिवाळे, अंमलदार शिंदे यांनी केली.

तक्रारदार दिव्यांग असतानाही त्रासतक्रारदार हा दिव्यांग आहे. तरीही त्याला वारंवार पोलिस ठाण्यात बोलावून घेत मारुती केदार याने त्याला त्रास दिला. तुझा जामीन तहसीलदार यांच्याकडे करायचा आहे. याला पैसे लागतात. त्यांनी जर जामीन नाकारला तर तुला जेलमध्ये जावे लागेल, अशी भीती केदारने तक्रारदाराला दाखवली होती. याच त्रासाला वैतागून एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती.

ठाणेदाराचीही होणार चौकशीचकलांबा पोलिस ठाणे कायम वादात असते. येथील ठाणेदार सपोनि नारायण एकशिंगे यांच्या वाळूच्या कारवाया वादात असतात. एखादी कारवाई केली की वरिष्ठांकडून वाहवा मिळवण्यासाठी बोभाटा केला जातो. प्रत्यक्षात आतून वेगळाच उद्योग चालतो. आता या प्रकरणातही ठाणेदार एकशिंगे यांचा सहभाग आहे का? याची चौकशी एसीबीकडून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBeedबीडCrime Newsगुन्हेगारी