शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बीड जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीची अधिकृत घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 00:01 IST

बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या ४ जानेवारी २०२० रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आजच (दि.१३) जाहीर करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. पीठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी (बीड) प्रवीण धरमकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्टÑवादी काँग्रेसच्या शिवकन्या सिरसाट व उपाध्यक्षपदी देखील राष्टÑवादी काँग्रेसचेच बजरंग सोनवणे यांची निवड झाल्याचे अधिकृत जाहीर केले.

ठळक मुद्देनिकाल जाहीर करण्यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठाचा आदेश : दहा दिवसांची प्रतीक्षा

बीड : बीडजिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या ४ जानेवारी २०२० रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आजच (दि.१३) जाहीर करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी (दि.१३) दिला. पीठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी (बीड) प्रवीण धरमकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्टÑवादी काँग्रेसच्या शिवकन्या सिरसाट व उपाध्यक्षपदी देखील राष्टÑवादी काँग्रेसचेच बजरंग सोनवणे यांची निवड झाल्याचे अधिकृत जाहीर केले.

खंडपीठाने यापूर्वी २ जानेवारी रोजी वरील निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे; परंतु याचा निकाल १३ जानेवारी २०२० पर्यंत जाहीर करू नये, असा आदेश दिला होता. दरम्यान झालेल्या निवडणुकीत विजयी उमेदवाराला ३२ आणि पराभूत उमेदवाराला २१ मते मिळाल्याचे आज खंडपीठात सादर करण्यात आलेल्या सीलबंद निकालपत्रावरुन स्पष्ट झाले. विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये ११ मतांचा फरक असल्यामुळे अपात्र ठरविलेल्या उमेदवारांच्या मतांचा निकालावर परिणाम झाला नसल्यामुळे खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना वरीलप्रमाणे आदेश दिला होता.राजकीय घडामोडी : अकरा मतांचा फरकअध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान झाल्यामुळे कुणाला किती मते पडली हे समजल्यामुळे निकाल कळाला असला तरी अधिकृत घोषणा बाकी होती. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवारांना अपक्ष एक, भाजपचे तीन, शिवसेनेचे चार, कॉँग्रेसचे दोन अशा दहा सदस्यांनी मतदान केल्याने ३२ विरुद्ध २१ मतांनी अध्यक्षपदासाठी शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे हे निवडून आले.१३ जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करु नये असे आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेले असल्याने अधिकृत निकाल जाहीर सोमवारी जाहीर केला. बीड जिल्हा परिषदेचा निकाल सीलबंद लखोट्यात कोषागारमध्ये सुरक्षित ठेवला होता. हा लखोटा आज सोमवारी खंडपीठासमोर उघडण्यात आला. अध्यक्षपदासाठी शिवकन्या सिरसाट यांनी भाजपाच्या उमेदवार डॉ.योगिनी थोरात यांचा तर उपाध्यक्षपदासाठी बजरंग सोनवणे यांनी भाजपाचे भारत काळे यांचा ३२ विरुद्ध २१ मतांनी पराभव केला.

टॅग्स :BeedबीडZP Electionजिल्हा परिषदAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ