शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून युवतीला व्हाॅट्सॲपवर पाठविले अश्लील मॅसेज; खाजगी शिकवणी चालकाचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 12:58 IST

crime news Beed : पिडीतेने बारावी झाल्यानंतर २०१७ साली कल्याण मोरे याच्या रसायन केमिस्ट्री नावाचा खाजगी शिकवणीत दोन महिने नोकर केली होती.

ठळक मुद्देपिडीतेने लग्नाला नकार दिल्यानंतही तो नेहमीच मागणी घालून त्रास देऊ लागला. त्रासाला कंटाळून पिडीतेने क्लासची नोकरी सोडून कुटुंबासह लातूरला शिक्षणासाठी गेली.

अंबाजोगाई : खाजगी क्लास मध्ये नोकरी करत असलेल्या २१ वर्षीय युवतीला क्लास चालकाने एकतर्फी प्रेमातून लग्नासाठी मागणी घातली. युवतीने नकार दिल्यानंतर त्याने ‌व्हाॅट्सॲपवर सतत अश्लील मेसेज करून त्रास देत विनयभंग केल्याची घटना अंबाजोगाई शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी क्लास चालकावर विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला.  पिडीतेने दिलेल्या तक्रारी नुसार,  बारावी झाल्यानंतर २०१७ साली कल्याण मोरे याच्या रसायन केमिस्ट्री नावाचा खाजगी शिकवणीत दोन महिने नोकर केली होती. त्या दरम्यान कल्याण मोरे याने तिला लग्नाची मागणी घातली. पिडीतेने त्याला नकार दिल्यानंतही तो नेहमीच लग्नासाठी मागणी घालून त्रास देऊ लागला. त्याच्या त्रासाला कंटाळून पिडीतेने क्लासची नोकरी सोडून दिली आणि कुटुंबासह लातूरला शिक्षणासाठी गेली. त्यानंतरही कल्याणने लातूरपर्यंत पाठलाग करून आणि सतत मेसेज, कॉल करून पिडीतेला त्रास दिला. काही काळानंतर पीडिता पुन्हा अंबाजोगाईला परतली, तिने मोबाईल क्रमांकही बदलला.

दि. ३ ऑक्टोबर रोजी कल्याणने पिडीतेच्या नातेवाईकाला कॉल करून तिचा मोबाईल क्रमांक विचारला आणि तिच्या बाबत अश्लील बोलला. पिडीतेचा क्रमांक प्राप्त करत गुरुवारी (दि.३१) कल्याणने तिला कॉल केला, परंतु त्याचा आवाज ऐकताच तिने कॉल बंद केला. त्यानंतर त्याने व्हाॅट्सॲपवर सतत अश्लील मेसेज पाठवले. नववर्षाची सुरुवात झाली तरी त्याचे मेसेज सुरूच होते. अखेर त्रासलेल्या पिडीतेने शुक्रवारी (दि.०१) अंबाजोगाई शहर ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तिच्या तक्रारीवरून कल्याण मोरे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.ना. घोळवे करत आहेत. रात्री उशिरापर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपBeedबीडCrime Newsगुन्हेगारी