शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नर्सिंगच्या पीडित विद्यार्थिनीला दाखवली भिती; बीड शहर पोलिसांची होणार चौकशी

By सोमनाथ खताळ | Updated: March 24, 2025 18:49 IST

बीड शहरात गृह भेटीसाठी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या सहा मुली गेल्या होत्या. त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोन टवाळखोरांनी चिठ्ठी देण्यासह छेड काढली होती.

बीड : शहरातील एका नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची दोन टवाळखोरांनी छेड काढली हाेती. याप्रकरणी गुन्हा दाखल करू नये, यासाठी पीडितेसह तिच्या सोबतच्या लोकांना बीड शहर पोलिसांनीच भिती दाखविल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणात पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दखल घेतली असून त्यावेळी हजर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी लावली आहे. अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर हे याची चौकशी करणार आहेत.

बीड शहरात गृह भेटीसाठी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या सहा मुली गेल्या होत्या. त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोन टवाळखोरांनी चिठ्ठी देण्यासह छेड काढली होती. याप्रकरणात दोन अनाेळखी व्यक्तींवर गुन्हा नोंद झाला. परंतू त्या आधी पीडिता गेल्यावर काही महिला कर्मचारी व पोलिस उपनिरीक्षकांनी पीडितासह तिच्या सोबतच्या लोकांना भिती दाखवली. आरोपी मुलगा त्रास देईल, नंतर कोर्टात चकरा माराव्या लागतील, असे म्हणून त्यांना तेथून काढून देण्याचा प्रयत्न केला. परंतू ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांना समजताच त्यांनी ठाण्यात धाव घेतली. त्यांच्याशीही उद्धट वर्तन करण्यात आले. हा प्रकार पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांना समजताच बीड शहर ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी लावण्यात आली आहे. सचिन पांडकर यांच्याकडून सोमवारी त्यांची चौकशी करण्यात आली. यासाठी सकाळपासूनच कर्मचारी हे पोलिस अधीक्षक कार्यालयात उभा होते.

कारवाई होणार की पाठिशी घालणार?या प्रकरणात संबंधित कर्मचारी हे एकमेकांकडे बोट दाखवत होते. शिवाय मी असे केलेच नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. परंतू हा सर्व प्रकार बीड शहर ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता खरोखरच कारवाई होणार की, महिला अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यात आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाठिशी घालणार? याकडे लक्ष लागले आहे. पांडकर यांचीही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतू ते बैठकीत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी