शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

रागात १०० क्रमांक डायल केला अन् पोलिसांची रात्रभर धावपळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:07 IST

व्यक्तीगत वादातून सहकाऱ्याला गुंतविण्यासाठी त्याने आपला ट्रक रस्त्यात आडविला आणि मारहाण करून १८०० रूपये लुटल्याची तक्रार पोलीस हेल्पलाईनच्या १०० या क्रमांकावर रविवारी पहाटे २ वाजता दिली.

ठळक मुद्देवडवणीजवळील प्रकार : म्हणे, रस्त्यात ट्रक अडवून मारहाण करीत लुटले

बीड / वडवणी : व्यक्तीगत वादातून सहकाऱ्याला गुंतविण्यासाठी त्याने आपला ट्रक रस्त्यात आडविला आणि मारहाण करून १८०० रूपये लुटल्याची तक्रार पोलीस हेल्पलाईनच्या १०० या क्रमांकावर रविवारी पहाटे २ वाजता दिली. त्यानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. संबंधिताला पकडून खात्री केल्यानंतर त्याने खरा प्रकार सांगितला. हा प्रकार रविवारी पहाटे २ ते ६ यावेळेत बीड-वडवणी रस्त्यावर घडला. हा प्रकार खोटा असल्याचे सिद्ध झाले असले तरी पोलीस सतर्क असल्याचे दिसून येते.चंद्रकांत आंधळे (रा.जिरेवाडी ता.पाथर्डी जि.अ.नगर) असे फोन करणाºया ट्रक चालकाचे नाव आहे. चंद्रकांत व त्याचा अन्य एक ट्रकचालक वडवणी जवळील एका धाब्यावर बसले. तेथे जेवणासह मद्यपान केले. याचवेळी दुसºया ट्रकचा मालक भगवान श्रीमंत बडे हे तिथे आले. मद्यपान केलेले असल्यामुळे बडे यांनी दोन्ही चालकांना थोडे धारेवर धरले. हाच राग मनात धरून चंद्रकांतने वडवणीच्या थोडे पुढे आल्यावर रागाच्या भरात १०० क्रमांकवर कॉल केला. आणि मला रस्त्यात आडवून कारमधील (एमएच १६ बी ३१९८) तिघांनी मारहाण करून १८००० हजार रुपये लुटल्याची माहिती दिली. तसेच ही कार बीडकडे आल्याचे सांगितले.पोलिसांनी तात्काळ बार्शी नाका परिसरात नाकाबंदी केली. कार दिसताच कारसह तिघांना ताब्यात घेतले. त्यांना नियंत्रण कक्षात आणून त्यांची चौकशी केली. यामध्ये या घटनेचे आपल्याला काहीच माहिती नसल्याचे बडे यांनी पोलिसांना सांगितले. तर दुसºया बाजुला संबंधित ट्रकचालकाला संपर्क साधून ताब्यात घेतले. त्याचीही चौकशी केली. वडवणी पोलिसांना घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सांगितले. मात्र असे काहीच झाले नसल्याचे समजले.पोलिसांनी चंद्रकांतला विश्वासात घेत माहिती विचारली. त्यानंतर त्याने बडे याने आपल्याला झापल्यामुळे आलेल्या रागातून त्यांना कायद्याच्या कचाट्यात गुंतविण्यासाठी आपण हा कॉल केल्याचे कबुल केले. हा प्रकार खोटा असल्याचे समजताच पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वडवणीचे सपोनि सुरेश खाडे, मनोज जोगदंड, सी.के.माळी, संजय राठोड, राम बारगजे, विठ्ठल गित्ते, महेश गर्जे आदींनी यासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीस