शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

परळी वीजवितरण कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 16:51 IST

येथील वीज वितरण कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासह शाखा अभियंत्यांची चार पदे रिक्त आहेत.

परळी (बीड) : येथील वीज वितरण कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासह शाखा अभियंत्यांची चार पदे रिक्त आहेत. यामुळे वीज वितरण कंपनीच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे ग्राहकांची ससेहोलपट होत आहे. शाखा अभियंता व जन मिञांची रिक्त पदे न भरल्याने ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

परळी तालुक्यातील धर्मापुरी, सिरसाळा, ग्रामीण-१ , अर्बन- २  येथील शाखा अभियंता पद रिक्त आहेत. या रिक्त पदाचा कारभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. मागील एका वर्षापासून ही स्थिती आहे. तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याचे पद रिक्त असल्याने अंबाजोगाईच्या मंगेश केंद्रे यांच्याकडे अतिरिक्त कारभार आहे. वीज वितरण कार्यालयात अधिकारी नसल्याने कामाचा खेळखंडोबा होत आहे. लातूरच्या मुख्य अभियंता परळीच्या दौऱ्यावर असतांना हा विषय छेडला असता त्यांनी यावर भाष्य केले नाही. तसेच इतर वरिष्ठ अधिकारी ही तोंडावर बोट ठेवतात. त्यामुळे ही पदे भरल्या जात नाहीत. वरिष्ठ कार्यालयाकडे रिक्त पदे भरण्याचा पाठपुरावा चालू असल्याचे समजते परंतु प्रत्यक्षात माञ कार्यवाही होत नाही. 

५० गावांसाठी केवळ ८ कर्मचारी सिरसाळा शाखेत ५० गावे असून केवळ ८  कर्मचाऱ्यांवरच कामकाज चालू आहे. सिरसाळा गावात १  दिवसा व १  राञीसाठी  असे 2 कर्मचारी आहेत. सिरसाळा शाखा अंतर्गत जनमिञांची संख्या कमी आहे. या शाखेला शाखा अभियंता ही नाही.

ग्रामीण-2 मध्ये केवळ 4 जनमिञ आहेत. या शाखांतर्गत गावात नाथ्रा, लिंबोटा, दाऊतपूर, भोपला, वागबेट, बेलंबा, पांगरी, संगम, लोणारवाडी, कौठळी, इंदपवाडी,जिरेवाडी, कन्हेरवाडी, दगडवाडी, लोणी, सेलु, वसंतनगर, धारावती तांडा, चंादापूर, मलकापूर, नंदागौळ, परचुंडी, तडोळी यासह अन्य गावाचा समावेश आहे. या ठिकाणी वीज वितरणचे कामे कर्मचाऱ्याअभावी वेळेवर होत नाहीत. यामुळे वीज बंद झाल्यास परत उपलब्ध होण्यास वेळ लागतो. वीजबिले वेळेवर मिळत नाहीत. तसेच वीज दुरूस्तीची कामे होण्यास विलंब लागतो. वीज साहित्याचा अभाव, वीजबिले वेळेवर न येणे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजbillबिल