शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लोटस हॉस्पिटलमधील कोरोना मृत्यू प्रकरणात चौकशी समितीलाच नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 15:21 IST

चौकशीला उशीर झाल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी मंगळवारी समितीलाच नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देसमितीलाच नोटीस दिल्याने अहवाल तत्परतेने मिळेल असा कयास आहे.

बीड : येथील वरिष्ठ तुरूंग अधिकारी संजय कांबळे यांचा बीडमधील लोटस हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. यात हलगर्जी झाल्याचा आरोप करीत तक्रार करण्यात आली होती. याला महिना उलटूनही अद्याप चौकशी पूर्ण करून अहवाल दिला नाही. याबाबत आता चौकशी समितीलाच नोटीस बजावली आहे. या सर्व प्रकारावरून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे. 

वरिष्ठ तुरूंग अधिकारी संजय कांबळे यांचा ३ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता. लोटस हाॅस्पिटलमधील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी वेळीच व योग्य उपचार न केल्यामुळेच कांबळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते अशोक सुखवसे यांनी तक्रार केली होती. यावर चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डाॅ.संजय राऊत, डॉ.मंडलेचा यांची समिती तयार केली. याला महिना उलटूनही अद्याप अहवाल दिलेला नाही. विशेष म्हणजे याचा अहवाल सोमवारी देणार असल्याचे सांगितले होते. परंतु दिला नसल्याने समितीच्या चौकशीवरच संशय व्यक्त केला जात आहे. हे प्रकरण दडपण्यासाठीच चौकशीला उशीर लावल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला चौकशीला उशीर झाल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी मंगळवारी समितीलाच नोटीस बजावली आहे. यावर समिती सदस्यांकडून चौकशी अहवाल किती कालावधीत कशा प्रकारे येतो यावर पुढील कार्यवाही अवलंबून असल्याचे सूत्रांनी सांगितले. समितीलाच नोटीस दिल्याने अहवाल तत्परतेने मिळेल असा कयास आहे.

लोटस हॉस्पिटलच्या चौकशीचा अहवाल सोमवारी देतो म्हणाले होते. परंतु आणखी आला नाही. आता समितीलाच नोटीस बजावून उशिराच्या कारणासहीत खुलासा मागविला आहे. - डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

अद्याप अहवाल दिलेला नाही. डाॅ.राऊत व डॉ.मंडलेचा हे इतर ठिकाणचे आहेत. त्यांना वेळ नव्हता म्हणून अहवाल देण्यास उशीर होत आहे. - डॉ.सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, बीड 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड