शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

'५० हजार नाही तुम्ही ५ लाख घ्या'; बिनव्याजी कर्जाचे आमिष देत तरुणास ९० हजाराला फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 18:53 IST

Cyber Crime in Beed : सोशल मिडियावर सध्या कर्ज देणाऱ्या अ‍ॅपचे मेसेज व्हायरल आहेत. या द्वारे देण्यात येणाऱ्या अमिषाला अनेक तरुण बळी पडत असल्याचे उघडकीस आले आहे.

अंबाजोगाई : ५० हजार रुपये कर्ज काय मागता ? पाच लाख रुपये बिनव्याजी घ्या, अशी बतावणी करत बनावट आर्थिक संस्थेने एका युवकाची तब्बल ९० हजार रुपयांची फसवणूक केली. अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील बालासाहेब पवार असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. 

सोशल मिडियावर सध्या कर्ज देणाऱ्या अ‍ॅपचे मेसेज व्हायरल आहेत. या द्वारे देण्यात येणाऱ्या अमिषाला अनेक तरुण बळी पडत असल्याचे उघडकीस आले आहे. काही आठवड्यात अंबाजोगाईतील रहिवाशी असलेली व मुंबईतील प्रख्यात डॉक्टरची अशाच आमिषामुळे दोन लाखांची फसवणूक झाली होती. याला आठवडा होत नाही तोच अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील बालासाहेब अशोक पवार यांची सायबर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. बाळासाहेब पवार यास धानी लोन बाजार या ग्रुपवरुन निनावी फोन आला. तुम्हाला ५० हजार रुपयाचे कर्ज मंजुर झाले आहे. त्यासाठी २२५०/- प्रोसेसिंग चार्ज भरावा लागेल असे सांगितले. 

संतापजनक ! मूकबधिर विवाहितेवर नराधमाने घरात घुसून केला अत्याचार

तो भरल्यानंतर संबंधित व्यक्तीने तुमचे सिबील खूपच चांगले आहे, त्यामुळे ५० हजारापेक्षा तुम्हाला ५ लाख रुपयांचे कर्ज आमच्या ग्रुपमधून मिळू शकते असे आमिष दाखवले. तसेच तरुणाकडून त्याने टप्याटप्याने ९० हजार ४४० रुपये खात्यातून वर्ग करुन घेतले. हा प्रकार बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी बीडच्या सायबर क्राईमला तक्रार केली. परंतु, संबंधित व्यक्तीने ही रक्कम दुसर्‍याच्या खात्यावर वर्ग केलेली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी बर्दापूर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

भरधाव वाहनाने पादचारी तरुणास चिरडले; गढी-माजलगाव रोडवरील घटना

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमBeedबीडMONEYपैसा