शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपाचे बिल भरावे लागणार नाही, शेतकऱ्यांना वर्षभर दिवसाही वीज मिळेल: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 18:04 IST

पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही , समुद्रात वाहून जाणारे पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्पाला गती देण्यात येत आहे

परळी : महायुतीच्या राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. वर्षातील ३६५ दिवसा ही वीज पुरवठा करण्याची योजना अमलात आणण्यात येणार आहे.  मराठवाडा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी महायुती सरकारने सिंचन प्रकल्पासाठी मान्यता दिली आहे. मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेचे कामे झालेले आहे. त्याशिवाय मराठवाड्याच्या हक्काचे पाणी आता आष्टी पर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी नेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी येथे बुधवारी बोलताना दिली. 

परळीत पाच दिवसीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते ते पुढे म्हणाले की, दुष्काळी भाग म्हणून मराठवाडा ओळखला जातो. पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही , समुद्रात वाहून जाणारे पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्पाला गती देण्यात येत आहे. त्याबरोबरच शासनातर्फे शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर ड्रीप देणार आहोत तसेच ट्रॅक्टर व कृषी अवजारे ही देण्यात येतील अशी घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यापुढे कृषी पंपाचे शेतकऱ्यांना वीज बिल भरावे लागणार नाही, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनीचे काम १८ महिन्यात पूर्ण होईल त्यानंतर ३६५ दिवस वीज शेतकऱ्यांना दिवसा ही वापरता येणार आहे असेही ते म्हणाले. 

मराठवाड्याचा सिंचनाचा बॅकलॉग दूर करण्यात येईल यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. समुद्रात वाहून जाणारे ५० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची योजना अंतिम टप्प्यात असून बीड जिल्ह्यातील आष्टीपर्यंत लवकरच हे पाणी येईल. यासाठी मराठवाड्याचे हक्काचे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी सुमारे ११ हजार कोटींची कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना हाती घेण्यात आली आहे. ११ सिंचन प्रकल्पांसाठी १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातून शेतकऱ्यांना विविध बाबींचा लाभ देण्यासाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच जायकवाडी प्रकल्पाच्या टप्पा-२ साठी ५३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून माजलगाव कालव्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्यातील ८५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष दूर होईल,असा दावा फडणवीस यांनी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीड