शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

शेतीच्या वादातून भावकी-शेजारी उठले जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : खरीप हंगामाच्या मशागतीला सुरुवात झाली असून विविध कारणास्तव शेतजमिनीच्या कारणावरून भावकीत व शेजाऱ्यांसोबत वादाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : खरीप हंगामाच्या मशागतीला सुरुवात झाली असून विविध कारणास्तव शेतजमिनीच्या कारणावरून भावकीत व शेजाऱ्यांसोबत वादाच्या घटना वाढल्या आहेत. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात एका महिन्यात शेकडो गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना व जनजागृती केली जात आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामातील क्षेत्रफळ हे जवळपास ६ लाख ५० हजार हेक्टर इतके आहे. खरीप हंगामातील पीक-पेरणीसाठी शेतीची मशागत, उन्हाळी कामे सुरू झाल्यापासून शेतीच्या वादाला अनेक ठिकाणी तोंड फुटतात. याप् रकरणात महसूल विभागाची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, त्याकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतातील विविध मशागतीच्या वेळी हे वाद उफाळून येतात, तर शेतीच्या वादातून गंभीर गुन्ह्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामुळे मशागत सुरू झाल्यानंतर शेतीच्या वादातून घडणारे गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून गावागावांत जनजागृती करण्यात आली. आपसात वाद न घालता रीतसर महसूल विभागाकडे यासंदर्भात तक्रार करण्याचे आवाहनदेखील केले आहे.

मागील वर्षी शेतीच्या वादातून केज तालुक्यातील मांगवडगाव येथे तिघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती, तर बांध कोरणे, पोवळीवरील दगडं उचलणे, वाटणी पत्रावरून होणारे गुन्हे एप्रिल व मे महिन्यात जास्त झाले आहेत. विविध पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत. यापैकी अनेक गुन्हे भावाभावांत, भावकीत किंवा शेजाऱ्यासोबत असतात. त्यामुळे या वादातून शत्रुत्व वाढत जाते. त्याचे पर्यवसान हे गंभीर गुन्ह्यात होण्याचीदेखील भीती असते. त्यामुळे सर्वांनी समजूतदारपणे ही भांडणे गावात ज्येष्ठांसोबत बसून सोडवणे गरजेचे आहे, अन्यथा यामधून सर्वांचेच आर्थिक नुकसान होते. महसूल विभागानेदेखील या प्रकरणांमध्ये लक्ष घालून प्रकरणे निकाली काढण्यासाठी योग्य ती कार्यवाही तातडीने करणे गरजेेचे आहे, अशी मागणी आहे.

...

२०२० मे आणि जूनमधील शेतीच्या वादातून घडलेले गुन्हे

दुखापत करणे, जमावाकडून मारहाण व इतर -२२५

जीवघेणा हल्ला करणे -२०५

...

मुळात जमिनीचे वाद हा विषय महसूल प्रशासनाचा आहे. मात्र, शेतीच्या वादातून गुन्हे घडले तर आम्ही योग्य ती कारवाई करतो. आमच्याकडे काही प्रकरणे आली तर त्यामध्ये मध्यस्थी करण्याचे आदेशदेखील ठाणेप्रमुखांना देण्यात आलेले आहे. नागरिकांनीदेखील विनाकारण वाद घालू नयेत.

-आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड.

............

शेतीच्या मशागतीच्यावेळी शेजाऱ्यासोबत होणाऱ्या भांडणाचे प्रमाण या दोन महिन्यांत वाढले आहे. त्यामधून गुन्हेदेखील वाढतात. यासाठी आपसात वाद मिटवणे गरजेचे आहे. गुन्हे घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.

-सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, बीड.