शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा रस्तारोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 13:30 IST

माजलगाव तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज परभणी फाटा येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

माजलगाव (बीड) : माजलगाव तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि माजलगाव धरणात ३ टीएमसी पाणी सोडावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज परभणी फाटा येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सुमारे दोन तास वाहतूक खोळंबली होती. 

यावर्षी माजलगाव तालुक्यात अत्यल्प  पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मुग, तूर,  उडीद, बाजरी, आदी पिके धोक्यात आली असून यामुळे शेतकऱ्यावर अस्मानी संकट ओढावले आहे , भविष्यात पिण्याचा पाण्याचा तसेच गुरा ढोरांच्या चारच्या देखील गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे  माजलगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानी संदर्भात हेक्टरी 50000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, गेल्या वर्षीचे बोंडअळीचे अनुदान तातडीने वाटप करावे, शेतीपंपाची लोडशेडींग बंद करावी. गेल्या वर्षीच्या खरीपच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी ऑनलाईन भरलेल्या पिक विमा ची रक्कम खात्यावर तातडीने भरावी. भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या उपाय योजना कराव्यात  यासह अनेक मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने रस्तारोको आंदोलन येथील परभणी फाट्यावर करण्यात आले. 

दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे परभणी फाटा येथे येणाऱ्या तिन्ही रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आंदोलकांनी तहसीलदार एन.जी. झम्पलवाड यांना निवेदन दिले. आंदोलनात बाजार समिती सभापती अशोक डाक, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे मराठवाडा सरचिटणीस जयसिंग सोळंके,  दीपक जाधव , जयदत्त नरवडे, नीलकंठ भोसले, वसीम मनसबदार, बाळासाहेब जाधव,  चंद्रकांत शेजुळ, दयानंद स्वामी, मनोज फरके , प्रा. प्रकाश गवते, कल्याण आबुज, शरद चव्हाण,महिवाल लांडगे , विश्वंभर थावरे आदींची उपस्थिती होती. 

माजलगाव धरणात ३ टीएमसी पाणी सोडा यावेळी माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी नगर नाशिक मधील धरणातून जायाकावाडीला १३ टीएमसी पाणी सोडून त्यातील ३ टीएमसी पाणी माजलगाव धरणात सोडण्याची मागणी केली. यासोबतच चुकीच्या आणेवारीमुळे माजलगाव तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आला आहे याची किंमत सरकारला मोजावी लागेल, पाण्याच्या प्रश्न लवकर निकालात काढावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सोळंके यांनी दिला. 

टॅग्स :BeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन