शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एनसीसीमुळे घडते देशसेवा; बीड जिल्ह्याची उंचावतेय मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 23:42 IST

एनसीसी (नॅशनल कॅडेट कोअर) मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु जागा मोजक्याच आहेत. असे असले तरी आहे त्या विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकवर्षी बीडमधील किमान ५० ते ६० विद्यार्थी देशसेवेसाठी जात असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देप्रत्येक वर्षी ५० ते ६० विद्यार्थी जातात देशसेवेला

बीड : एनसीसी (नॅशनल कॅडेट कोअर) मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु जागा मोजक्याच आहेत. असे असले तरी आहे त्या विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकवर्षी बीडमधील किमान ५० ते ६० विद्यार्थी देशसेवेसाठी जात असल्याचे सांगण्यात आले. एनसीसी विभागाची यशस्वी वाटचाल तर सुरूच आहे, शिवाय प्रत्येकवर्षी यशाचा टक्काही वाढत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नुकत्याच झालेल्या पोलीस, सेना भरतीत बीडमधील ५० च्यावर विद्यार्थी निवडले गेले आहेत. यामुळे बीडची मान उंचावली आहे.

राष्ट्रीय छात्र सेना हा केंद्र शासनाकडून राबविण्यात येणार उपक्रम आहे. याबाबत जास्त कोणाला माहिती नाही. हाच धागा पकडून सोमवारी ‘लोकमत’ने शहरातील एनसीसी आॅफिसरशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या अडचणींसह यशाचा उलगडा केला. बीड शहरातील भगवान विद्यालय, शिवाजी विद्यालय, चंपावती विद्यालय या तीन शाळा आणि बलभीम महाविद्यालय, केएसके महाविद्यालय आणि बंकटस्वामी महाविद्यालय अशा तीन महाविद्यालयांमध्ये एनसीसी विभाग कार्यरत आहे. यासाठी विशेष अधिकारीही नियूक्त केले आहेत. प्रत्येक सोमवार व मंगळवारी त्यांना प्रशिक्षण दिले जाते.

एनसीसीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडूनच कपडे, बुट व इतर भत्ता दिला जातो. तसेच त्यांना लष्कर, पोलीस भरतीचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांची शारिरीक व मानसिक चाचणी घेतली जाते. त्यांना अनुभव व पूर्व तयारी म्हणून प्रात्यक्षिके घेतली जातात. विशेष शिबीरांचे आयोजनही केले जाते. या सर्व परिस्थितीमुळे आणि एनसीसी आॅफिसरच्या योग्य मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी जाताना सहज यश मिळत आहे. यासाठी त्या त्या शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक़, प्राचार्यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे सांगण्यात आले.एनसीसीत सहभागासाठी ही आहे पात्रताएनसीसीमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर शाळा व महाविद्यालय स्तरावर वेगवेगळी पात्रता आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्याचे वय १३ वर्षापेक्षा जास्ता असावे, ५ फुटापेक्षा जास्त उंची असावी, धावण्यात सक्षम असावा. महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्याचे वय १६ ते २५ वर्षे या दरम्यान असावे, उंची पाच फुट पाच इंच पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी निवडक वेळात धावण्याचे अंतर पार करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याची शारिरीक व मानसिक तंदरूस्ती आवश्यक आहे.

मुलींसाठी ३० टक्के आरक्षणआतापर्यंत एनसीसीमध्ये केवळ मुलेच सहभागी होत होते. परंतु आता नियोजीत कोट्यात ३० टक्के मुलींचाही सहभाग असावा, असे निर्देश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यापुर्वी बोटावर मोजण्याइतपतच मुली यामध्ये सहभागी होत असत.

सामाजिक उपक्रमांत अगे्रसररॅली, स्वच्छता, रक्तदान अशा विविध सामाजिक उपक्रमांत एनसीसी विभाग हा अग्रस्थानी असतो. तसेच आपत्ती व्यवस्थापनातही जीव धोक्यात घालून कार्य करतात. दोन वर्षापूर्वी बीडमध्ये आलेल्या बिंदुसरा नदीतीला पुरात या विभागातील मुलांनी कर्तव्य बजावून प्रशासनाला सहकार्य केले होते.

स्वतंत्र अधिका-याची गरजएनसीसी विभागासाठी स्वंतत्र आॅफिसरची आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी या आॅफिसरला शाळेतील इतर कामे करावी लागतात. त्यामुळे त्यांना अनंत अडचणी येतात. तसेच सध्या ६०० ते ९०० रूपये असे तुटपुंजे मानधन दिले जाते. ते वाढवून सहा ते सात हजार रूपये करावे, अशी मागणीही अधिका-यांमधून करण्यात आली.

टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडा