शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदार आशा वाघ हल्ला प्रकरण; भावजयीसह चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 19:58 IST

नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

- मधुकर सिरसट केज (बीड): येथील महिला नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांचा दोरीने गळा आवळून, अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपी विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी वाघ यांच्या नात्यातीलच आहेत. 

शुक्रवारी ( दि. २०) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान केज तहसीलच्या संजय गांधी व श्रावण बाळ योजना विभागाच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड या बीड रोड लगत असलेल्या त्यांच्या निवास्थानी दुपारचे जेवण करून तहसील कार्यालयाकडे आपल्या मोपेडवरून जात असताना, चारचाकी गाडीतून आलेली त्यांची भावजयी सुरेखा मधुकर वाघ, तिचा भाऊ हरिदास भास्कर महाले आणि  आई मुंजाबाई भास्कर महाले आणि एक अनोखी महिला व वाहन चालक यांनी त्यांना रस्त्यात अडवून जळगाव जिल्ह्यातील दोनडिगर येथील जमिनीच्या हक्क सोड पत्रावर सही करण्यासाठी जबरदस्ती केली.

तसेच सहा महिन्यापूर्वी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या भावाची जेल मधून सुटका करण्यासाठी पोलीस केस मागे घे, असे बोलतानाच त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी आशा वाघ-गायकवाड यांच्या गळ्यात दोरी टाकून गळा आवळण्यात आला. हरिदासने पेट्रोल व ज्वलनशील द्रवपदार्थ अंगावर  टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, आशा वाघ- गायकवाड यांनी आरडा ओरड करून रस्त्या लगतच्या हॉटेलच्या दिशेने पळाल्या, दरम्यान हल्लेखोर बीडच्या दिशेने वाहनातून पळून गेले.

नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी गु र नं 29/2023 भा दं वि 307 आणि 34 नुसार जिवे मारण्याचा  प्रयत्न करणे या आरोपाखाली सुरेखा मधुकर वाघ, हरिदास भास्कर महाले, मुंजाबाई भास्कर महाले एक अनोळखी महिला व पुरुष या पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आंनद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.

आरोपींवर कठोर कारवाई करा या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या सदस्य ॲड. संगिता चव्हाण आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या संगिता तुपसागर-भोसले यांनी  महिला नायब तहसीलदार आशा वाघ.. गायकवाड यांची भेट घेऊन चौकशी केली. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघामोडे यांच्याकडे आरोपींविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी