शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या गर्लफ्रेंडला बीडमध्ये पेट्रोल टाकून जाळले, बॉयफ्रेंडला जन्मठेप

By सोमनाथ खताळ | Updated: March 10, 2023 15:50 IST

जिल्हा व सत्र न्यायालय निकाल : अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून केला होता खून

बीड : एकाच गावातील प्रेमीयूगूल लग्न न करताच सोबत रहात होते. दोन वर्ष सोबत राहिल्यानंतर प्रियकराने आपल्या गर्फफ्रेंडवर इतरांसोबत अफेअर असल्याचा संशय घेतला. यातूनच त्याने पुण्यातून बीड जिल्ह्यात आणत तिला पेट्रोल टाकून जाळले. याच प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवारी हा निकाल दिला.

अविनाश रामकिशन राजुरे (वय २५ रा.शेळगाव ता.देगलूर जि.नांदेड) असे शिक्षा झालेल्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. सावित्रा दिगंबर अंकुलवार (वय २२) व अविनाश हे एकाच गावातील आहेत. दोघांचे प्रेम जुळले आणि ते घरातून पळून घोडनदी (ता.शिरूर जि.पुणे) येथे आले. दोन वर्षे ते पती-पत्नी असल्यासारखे सोबत राहिले. १३ नोव्हेंबर २०२० साली अविनाशने सावित्राला परळी व औढांनागनाथ येथे फिरायला जायचे असे सांगितले. बीड तालुक्यातील येळंबघाट येथे त्यांनी एका खदानीत मुक्काम केला. याच ठिकाणी १४ नोव्हेंबर रोजी ऐन लक्ष्मीपुजनाच्या दिवशी त्याने सावित्रा झोपेत असतानाच तिचा गळा दाबला. तसेच सोबत आणलेले पेट्रोल व ॲसिड टाकून तिला जाळले. ती मयत झाली, असे समजून त्याने तेथून पळ काढला. दरम्यान, सकाळी हा प्रकार शेतकऱ्याच्या लक्षात आला आणि त्याने नेकनूर पोलिसांना माहिती दिली. पीडितेला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. तिचा मृत्यूपूर्व जबाबही घेण्यात आला. परंतू अवघ्या काही तासांतच तिची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी अविनाश विरोधात नेकनूर ठाण्यात खुनासह पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, केजचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत, नेकनूरचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक व्ही.ए.जाधव यांनी तपास करून दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले. याचा निकाल शुक्रवारी लागला. यात जिल्हा व सत्र न्या.एच.एस.महाजन यांनी अविनाशला जन्मठेपे व ५ हजा रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड.अजय दि.राख यांनी काम पाहिले. त्यांना माजी सरकारी वकील ॲड.मिलींद वाघीरकर यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकरी उपनिरीक्षक बी.व्ही.जायभाय, सी.एस.सांगळे, परमेश्वर सानप यांनी काम पाहिले.

ऐन लक्ष्मीपुजनाच्या दिवशी घटनादिवाळीचा सणातच ऐन लक्ष्मी पुजनाच्या दिवशी ही घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी अविनाशच्या गावात जावून मुसक्या आवळल्या होत्या. तसेच पोलिसांचा योग्य तपास व सरकारी वकिलांचा युक्तीवाद पाहता न्यायालयाने आरोपीस जन्मठेप सुनावली आहे. या प्रकरणात ३० साक्षीदार तपासण्यात आले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडCourtन्यायालय