शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्याला चक्क बोकडाचे नामकरण; शेतकऱ्याच्या लाडक्या 'चेतक'चा सोशल मीडियात धुरळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 14:31 IST

शेतकऱ्याने ८ महिन्यांच्या या बोकडाचा नामकरण सोहळा शेतात अत्यंत उत्साहात केला

- संतोष स्वामी दिंद्रुड (बीड): गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लहान बाळांचे नामकरण हे सर्वश्रुत आहे. परंतु, माजलगाव तालुक्यातील चोपनवाडीच्या शेतकऱ्याने चक्क लाडक्या बोकडाचे नामकरण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केले. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने बीड जिल्ह्यात आता 'चेतक' हा बोकड चर्चेत आहे. दरम्यान या घटनेची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा रंगली आहे. 

माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी येथील विठ्ठल डीसले या शेतकऱ्याने जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय जोपासला आहे. यातच त्यांनी नऊ महिन्याचा बिटल जातीचा बोकड तब्बल सत्तर हजार रुपयांत खरेदी केला. दरम्यान, या लाडक्या बोकडाचे नामकरण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्याचा डीसले यांनी ठरवले. बुधवारी (दि.२२) सकाळी गुढी उभारून डिसले यांनी स्वतःच्या शेतात बोकडाचा नामकरण सोहळ्याची जय्यत तयारी केली. 

यावेळी बोकडाच्या गळ्यात पुष्पहार, पितळाची जाड साखळी, समोरच्या दोन्ही पायात पितळाचे तोडे, शरीराला चार-पाच ठिकाणी फित बांधून त्याला सजवण्यात आले. त्यानंतर महिलांनी गंध, गुलाल वाहून बोकडाचे औक्षण केले. त्यानंतर लाडक्या बोकडाचे 'चेतक' असे नामकरण झाल्याचे जाहीर करण्यात आले. या सोहळ्याला डीसले परिवारातील महिला, लहान मुले, शेजारील शेतकरी व शेळीपालन व्यवसाय करणारे सहभागी झाले होते. नामकरण सोहळ्यानंतर अल्पोपहाराचीही सोय डीसले परिवाराने केली होती.

प्रशंसनीय सोहळाअनेकजण पशुपालन हा जोडधंदा म्हणून करतात. मुक्या जनावरांचे पालन पोषण करतांना अनेकदा त्यांच्यावर जीव जडतो. हे प्राणी आपल्या कुटुंबातील सदस्य बनतात. 'हौसेला मोल नाही' या उक्तीप्रमाणे डिसले परिवाराने बोकडाच्या नामकरणाचा आगळावेगळा कार्यक्रम पार पाडला, हे प्रशंसनीय आहे. - बंडू जी. खांडेकर (मराठवाडा अध्यक्ष - भाजप भटके विमुक्त आघाडी)

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीड