शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नागझरी खून प्रकरण; सात जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:32 IST

गेवराई तालुक्यातील नागझरी येथे एकावर तलवारीने हल्ला करून खून केला होता. तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी गेवराई ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बीड : गेवराई तालुक्यातील नागझरी येथे एकावर तलवारीने हल्ला करून खून केला होता. तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी गेवराई ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मागील गुन्ह्यात झालेल्या खर्चावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातील तिघांना अटक केली आहे.उत्तरेश्वर भारत पवार (३४ रा.नागझरी) असे मयताचे नाव असून नारायण भारत पवार असे जखमीचे नाव आहे. तर गाड्या झरक्या चव्हाण, वाघ्या झरक्या चव्हाण, काक्या झरक्या चव्हाण, भंबळ्या पांगऱ्या काळे, सचिन भांबळ्या काळे, पहरेकर उंबऱ्या भोसले, झरक्या गणपती चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. उत्तरेश्वर व वाघ्या, गाड्या व इतरांमध्ये पैशावरून वाद सुरू होता. २०१६ साली या लोकांनी माजलगावमध्ये दरोडा टाकून एका व्यक्तीचा खून केला होता. यामध्ये हे लोक काही दिवस कारागृहात होते. तसेच या गुन्ह्यात जामीन मिळविण्यासाठी व इतर कामासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला होता. याच खर्चावरून त्यांच्यात वाद होत होते. यातूनच गुरूवारी सायंकाळी गाड्या, वाघ्या व इतर पाच जण नागझरीत आले. कुºहाड, तलवारीने हल्ला चढवून त्यांनी उत्तरेश्वरची हत्या केली. तर नारायणवरही तलवारीने सपासप वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर आगोदर जिल्हा रूग्णालयात उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला औरंगाबदला हलविले आहे. जावेद उर्फ पप्पू विश्वास चव्हाण (रा.नागझरी ता.गेवराई) यांनी याबाबत गेवराई ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास सपोनि राजाराम तडवी हे करीत आहेत.दरम्यान, यातील मुख्य आरोपी गाड्या, वाघ्या आणि काक्या या तिनही भावांना दरोडा प्रतिबंधक पथकाचे सपोनि गजानन जाधव व त्यांची टिम, स्थागुशाचे सपोनि अमोल धस व गेवराई पोलिसांनी अटक केली. जाधव, धस यांनी या प्रकरणात आरोपींना पकडण्यासाठी उसाच्या शेतात सापळा लावला होता.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी