शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

नगरपंचायत निवडणुकीची आयोगाकडून तयारी झाली सुरु; नेतृत्वावरून मातब्बर नेत्यांमध्ये कुरघोडी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:14 IST

Nagar Panchyat election आष्टी,पाटोदा,शिरूरमध्ये निवडणूक पूर्व तयारीला वेग

ठळक मुद्देइच्छुकांनी केल्या आपआपल्या वॉर्डात नागरिकाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नआपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी नेत्याच्या गाठीभेटीवर भर

- अविनाश कदमआष्टी : राज्यभरातील मुदत संपत आलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध करणे, सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दि 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम सुरू होणार आहे. तसा आदेश आज प्राप्त झाला असून आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामुळे बीड जिल्ह्यातल्या आष्टी, पाटोदा, शिरूर मध्ये नगरपंचायत निवडणूकपूर्व हालचालींनी वेग घेतला आहे. यासोबतच स्वपक्षातील मातब्बर नेते निवडणुकीला एकत्रित सामोरे जाणार की विरोधात लढणार हे स्पष्ट झाल्यास निवडणुक तयारीत अधिक रंग भरतील.

निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. प्रभागनिहाय प्रारूप यादी प्रसिद्ध करणे दि 15 फेब्रुवारी आणि याच दिवसापासून प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दि 15 ते 22 फेब्रुवारी दरम्यान असणार आहे. तर अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रमाणित करून प्रसिद्ध करणे दि 11 मार्च रोजी असणार आहे. यानंतर दि 8 मार्च रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करणे आणि मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या सर्व प्रक्रियानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आष्टी पाटोदा शिरूर नगरपंचायत निवडणूक हालचाल आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.

उमेदवारी मिळण्यासाठी धडपड तीनही तालुक्यातील नगरपंचायत निवडणुकीत इच्छुक कार्यकर्ते आपआपल्या वॉर्डात फिरून नागरिकाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच आपल्यालाच उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यावर सध्या भर देण्यात येत असल्याचे चित्र आहे. 

स्वपक्षातील नेते एकत्र लढणार की विरोधातआष्टी विधानसभा मतदारसंघातील आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तिन ही नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे आ. सुरेश धस, माजी आ. भिमराव धोंडे यांच्या भूमिकेकडे सध्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ते एकत्रित भाजपचे उमेदवार देतील ? की स्वतंत्र पॅनल उभा करतील या निर्णयानंतर निवडणुकीत रंग भरायला लागतील. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही निवडणुकीत नेतृत्वाचा मुद्दा पुढे येऊ शकतो. राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब आजबे, माजी आ. साहेबराव दरेकर, जिल्हा परिषद सदस्य सतिश शिंदे हे सध्या तरी एकत्र दिसत आहेत. मात्र, राष्ट्रवादी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि कॉंग्रेसला सोबत घेणार की स्वतंत्र लढणार याची जोरदार चर्चा सुरु आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकBeedबीडSuresh Dhasसुरेश धसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस