शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन वेळा विवाह अन् १२७ मुलांचे ‘माय-बाप’; बीडच्या प्रीती व संतोष गर्जे यांची 'लव्ह स्टोरी'

By सोमनाथ खताळ | Updated: February 14, 2025 16:29 IST

व्हॅलेंटाइन डे स्पेशल: चित्रपटातील कथेला लाजवेल, अशी ही यशोगाथा आहे.

बीड : सामाजिक काम करताना नातेवाइकांच्या मनाचाही विचार करावा लागतो. त्यामुळे एकाच जोडप्याने स्वत:साठी, आई आणि सासू-सासऱ्यांसाठी तीनवेळा विवाह केला. प्रीती व संतोष गर्जे असे या लव्ह बर्ड्सचे नाव असून, ते आज ‘सहारा’ (गेवराई, जि. बीड) अनाथालयातील १२७ मुलांचे माय - बाप म्हणून काम करतात. चित्रपटातील स्टोरीला लाजवेल, अशी ही यशोगाथा आहे.

संतोष १२ वी पास, तर प्रीती यांनी विधिची पदवी घेतली आहे. २०११ साली संतोष हे यवतमाळ येथे 'चलो युवा कुछ कर दिखाओ' या शिबिरात मार्गदर्शनासाठी गेले. तेथे प्रश्नोत्तर झाले. त्यानंतर एकमेकांचे संपर्क क्रमांक ‘शेअर’केले. ‘फ्रेंडशिप डे’ला प्रीतीचा पहिला मेसेज आला. सुरुवातीला मेसेज आणि नंतर कॉलवर बोलू लागले. संस्थेची माहिती आणि इतर हालचाली विचारू लागले. बोलताना ‘स्वभाव’ आवडला. संतोष यांना आपण करत असलेल्या कामासाठी ‘जोडीदार’ म्हणून प्रीती योग्य असल्याचा विश्वास बसला. त्यामुळे प्रीतीला सहारा अनाथालयात बोलावले. १० नोव्हेंबर २०११ रोजी त्या गेवराईला आल्या. सर्व पाहणी करून ते बांधावर गप्पा मारत होते. सूर्य मावळतीला जात असतानाच संतोष यांनी प्रीतीला ‘प्रपोझ’ केले. तेवढ्यावरच न थांबता उद्याच लग्न करू असा प्रस्तावही ठेवला. त्याप्रमाणे ११-११-२०११ या दिवशी दुपारी ११:११ मिनिटांचा मुहूर्त ठरला. आदल्या दिवशी सराफाकडून १ ग्रॅमचे मंगळसूत्र घेतले आणि ठरल्याप्रमाणे विवाह झाला.

कसे झाले तीन लग्न?११ नाेव्हेंबर २०११ साली प्रीती व संतोष हे दोघेच कपिलधार येथे गेले. एका झाडाखाली थांबून एकमेकांचा स्वीकार केला. त्यानंतर प्रीती परत यवतमाळला गेल्या. तीन महिने राहिल्या. फेब्रुवारीला परत आल्या. सोबत त्यांचे आई-वडील होते. त्यांनी संतोष यांचे काम पाहिले. तेव्हा ते ३५ मुलांचा सांभाळ करत होते. हे पाहून नोंदणी पद्धतीने २५० रुपयांत दुसरा विवाह झाला. याची बातमी झाल्यावर संतोष यांच्या आईला समजले. त्या रडत आल्या. नातेवाइक काय म्हणतील, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या समाधानासाठी १८ मार्च २०१२ ला पुन्हा तिसरे लग्न केले. तेव्हा २०० वऱ्हाडी होते.

१२७ मुलांना ‘सहारा’संतोष यांच्या बहिणीचा दुसऱ्या बाळंतपणात मृत्यू झाला. पहिल्या मुलीचा मेहुण्याने सांभाळ न केल्याने तिचे हाल पाहवले नाहीत. त्यामुळे २०२४ साली ‘सहारा’ अनाथालाय सुरू केले. सध्या येथे ४७ मुलींसह एकूण १२७ मुले आहेत. त्यांचा सांभाळ आई-वडील बनून प्रीती व संतोष गर्जे करतात. संतोष यांच्या पोटच्या स्वरा व ओवी या दोन मुलीही याच मुलांमध्ये असतात.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेBeedबीडsocial workerसमाजसेवक