शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

पतसंस्थेकडे गहाण ४० गुंठ्याची परस्पर विक्री; मंडळाधिकारी, तलाठ्यासह खातेदारांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 15:54 IST

या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

- नितीन कांबळेकडा - धानोरा येथील पतसंस्थेकडे दोन खातेदांरानी गहाणखत म्हणून ठेवलेल्या दोन हेक्टर क्षेत्रापैकी ४० गुठ्ठे क्षेत्राची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल आहे. या प्रकरणी व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिस ठाण्यात दोन तलाठी, एक मंडळाधिकारी यांच्यासह कुंबेफळ येथील दोन खातेदार अशा पाच जणांवर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील धानोरा येथील श्री. स्वामी समर्थ ग्रामीण पतसंस्थेत कुंबेफळ येथील दोन खातेदारांनी दोन हेक्टर आठ गुंठ्ठे क्षेत्र गहाणखत म्हणून ठेवले होते. नंतर संगणमत करून बॅकेचे परस्पर खाते निल केले. बाबतचे खोटे दस्तऐवज तयार केले. खोटे शिक्के तयार करून पतसंस्थेच्या नावे असलेले सातबारा उताऱ्यावरील बोजा कमी केला. लालासाहेब रंगनाथ मुठे यांनी बॅकेला गहाणखते ठेवलेल्या क्षेत्रापैकी २ हेक्टर ८ गुंठ्ठे इतके क्षेत्र मुलाच्या नावे वाटणीपत्र केले. शहाजी गाडे यांनी पतसंस्थेला गहाणखत म्हणून दिलेल्या क्षेत्रापैकी ४० गुंठ्ठे हे क्षेत्र किंमत २८ लाख ४० हजार रूपयांची बॅकेची कसल्याही प्रकारची परवानगी न घेता परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार १० मार्च २०२३ पूर्वी घडला आहे.

या प्रकरणी बाजीराव सिताराम गव्हाणे रा.पिंपरखेड ता.आष्टी व्यवस्थापक श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित धानोरा याच्या फिर्यादीवरून शुक्रवारी अंभोरा पोलिस ठाण्यात आरोपी लालासाहेब रंगनाथ मुठे खातेदार ,तत्कालीन तलाठी बापु पांडुरंग गव्हाणे, मंडळधिकारी संभाजी नामदेव गवळी, संदिप शहजी गाडे खातेदार, तत्कालीन तलाठी गणेश काशिनाथ गावडे यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड