शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाकावर अपहरण करून केला तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 19:28 IST

घटनेनतर महारुद्र हा फरार असून त्याचा शोध पिंपळनेर पोलीस घेत आहेत.

ठळक मुद्दे पिंपळनेर पोलीस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल

बीड : मावसबहिणीच्या कुटुंबातील वाद मिटवताना झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, गुरुवारी एका तरुणाचे अपहरण झाले होते. पहाटेच्या दरम्यान त्याचा खून करून त्याला आंतरवन पिंप्री फाटा परिसरातील डोंगरात झुडुपात फेकल्याचे शुक्रवारी सकाळी  उघडकीस आले. त्यानंतर तपासात खुनी निष्पन्न झाला असून, तो फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्याचे काम पिंपळनेर पोलीस करत आहेत. 

राजाभाऊ अशोक खराडे (वय २४ रा. नागापूर खुर्द ता.बीड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या मावसबहिणीच्या कुटुंबात वाद सुरु होता. तो मिटवण्यासाठी राजाभाऊ  गेला होता. त्यावेळी झालेल्या वादाच्या कारणावरून मावसबहिणीचा दीर महारुद्र मच्छिद्र परसकर (रा.उमरद खालसा ता.बीड) याचे व मयत राजाभाऊ यांचा वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून आंतरवली फाट्यावर महारुद्र गेला. त्याठिकाणी जाऊन एका व्यक्तीच्या फोनवरूनर राजाभाऊ याला फोन केला व त्याठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्यात त्याठिकाणी देखील वाद झाला. त्यावेळी त्याला चाकूचा धाक दाखवून त्याचे अपहरण केले. हा प्रकार तेथे असलेल्यानी राजेभाऊच्या घरी सांगितला. त्यानंतर राजाभाऊ याच्या आईने तात्काळ पिंपळनेर पोलीस ठाणे गाठून अपहरणाचा गुन्हा  गुरुवारी रात्रीच दाखल केला होता. 

पोलीस रात्रीपासून त्याचा शोध मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून घेत होते. त्यावेळी आंतरवण पिंप्री फाटा परिसरात शोध घेत असताना शुक्रवारी सकाळी राजाभाऊ याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर चाकूने  वार करून त्याचा खून केल्याचे दिसून आले. त्यानंतर घटनास्थळी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रमुख सोपनि शरद भुतेकर, सपोनि सानप, हावलदार एच.सी.तेलप, पोना सुरवसे, शेख, जाधव, चांदणे, कानडे यांनी पंचनामा केला. प्राथमिक तपास केला असता, महारुद्र याने चाकूचा धाक दाखवून अपरहण केल्याचे उघड झाले. त्या घटनेनतर महारुद्र हा फरार असून त्याचा शोध पिंपळनेर पोलीस घेत आहेत. या घटनेचा तपास सपोनि ज्ञानदेव सानप हे करत आहेत.  

चाकू केला जप्तमयत राजाभाऊ खराडे हा नागापूर खुर्द. येथील घरी असताना त्याला आंतरवन पिंप्री फाटा परिसरात दुसऱ्याच्या फोनवरून संपर्क करून बोलावून घेण्यात आले होते. त्यानंतर महारुद्र परसकर याने चाकूचा धाक दाखवत त्याचे अपहरण केले होते. त्याच चाकूने वार करून त्याचा खून केला. तो चाकू पोलिसांनी घटनास्थळावरून हस्तगत केला आहे.

उपअधीक्षकांची घटनास्थळाला भेट खुनाच्या घटनेची माहिती मिळताच बीडचे पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी घटनास्थळी भेट दिली. n पाहणी करून तपासाच्या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

टॅग्स :MurderखूनBeedबीडCrime Newsगुन्हेगारी