शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोनीमोहा येथील 'तो' प्रकार खूनाचा; बालकाच्या मृत्यू प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 12:35 IST

धारुर तालुक्यातील सोनिमोहा येथे गावाच्या उत्तरेस असलेल्या मिरास नावाच्या शेतजमीनीत सहा वर्षीय बालक यशराज दत्तात्रय दराडे हा बालक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता.

धारूर ( बीड ) : धारुर तालुक्यातील सोनिमोहा येथे एका 6 वर्षाच्या बालकावर अज्ञात वन्यपशूने हल्ला झाल्याची चर्चा सोमवारी  झाली होती. मात्र सदरील प्रकार हा वन्यप्राण्याच्या हल्ल्याचा नसून खूनाचा  असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून अज्ञात व्यक्ती विरोधात धारुर पोलिसांत रात्री उशिरा खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार धारुर तालुक्यातील सोनिमोहा येथे गावाच्या उत्तरेस असलेल्या मिरास नावाच्या शेतजमीनीत सहा वर्षीय बालक यशराज दत्तात्रय दराडे हा बालक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.  यशराजच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा आढळून आल्या होत्या.नातेवाईकांनी जखमी यशराजला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले. मात्र रविवारी रात्री उपचार सुरु असताना बालकाचा मृत्यू झाला. बालकाचे वडिल दत्तात्रय आश्रोबा दराडे यांचा शेळी व मेंढीपालनाचा व्यवसाय आहे.

सदरील प्रकाराची गावात अज्ञात वन्य प्राण्याचे हल्ला केल्याची चर्चा होती. सदर प्रकारानंतर पोलिस प्रशासनासह वन विभागाने प्रकाराची सखोल चौकशी केली. केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी तथा अतिरिक्त पोलिस अधिक्षक  पंकज कुमावत यांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक वैद्यकीय अहवालानूसार पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी घटनास्थळ पिंजून काढला. यावेळी वनविभागाचे अधिकारी  कर्मचारीही हजर होते. यात वन्यप्राण्याचे कसलेही ठसे अथवा खानाखूणा आढळून आले नाहीत. बालकाचा गळा चिरला गेला असल्याने  सदरील प्रकार हा खुनाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रात्री उशिरा धारुर पोलिसांत मयत बालकाचे अजोबा आश्रूबा दराडे यांचे फिर्यादी वरून  अज्ञात व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  या घटनेचा तपास बीड येथील पोलिस निरिक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्याकडे देण्यात आला आहे. सदर प्रकारानंतर पोलिसांची वाढलेली वर्दळ पाहता सोनिमोहा गावात खळबळ उडाली आहे. मात्र सदर प्रकरणाचा उलगडा पोलिस तपासा नंतरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीBeedबीड