शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरण; तिघांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:19 IST

शेतीच्या वादातून शहराच्या जवळ असलेल्या वासनवाडी शिवारात तीन सख्ख्या भावांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. यातील आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

ठळक मुद्देखूनात वापरलेला चाकू तपासात झाला हस्तगत

बीड : शेतीच्या वादातून शहराच्या जवळ असलेल्या वासनवाडी शिवारात तीन सख्ख्या भावांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. यातील आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच आरोपींकडून खूनात वापरलेला चाकू देखील हस्तगत करण्यात आला आहे.शहराजवळील वासनवाडी शिवारात शेतीच्या वादातून २७ जुलै रोजी दिलीप, प्रकाश, किरण पवने या सख्ख्या भावांचा, त्यांच्याच भावाने व पुतण्यांनी निर्घृणपणे हत्या केली होती. याप्रकरणी किसन पवने, डॉ.सचिन पवने व अ‍ॅड. कल्पेश पवने या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना दोन वेळा पोलीस कोठडी सुनावली होती. ९ आॅगस्ट रोजी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. २७ रोजी खून करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यारे परिसरातील विहिरी टाकले होते. या विहिरीतील पाणी मोटारच्या सहाय्याने काढून हत्यारे हस्तगत केली होती. त्यानंतर शहराच्या जवळून जाणाऱ्या एका ओढ्याजवळ चाकू फेकल्याची माहिती तपासादरम्यान आरोपींनी दिली. तो चाकू देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उप अधीक्षक भास्कर सावंत व बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनी सुजीत बडे हे करत आहेत. पुढील तपास सुरू राहणार असून तपास पूर्ण झाल्यनंतर पोलिसांकडून चार्जशिट दाखल करण्यात येणार आहे.हलाखीची परिस्थिती कुटुंबियांना केली मदतया प्रकरणात खून झालेल्या दिलीप, प्रकाश व किरण या तिघांचीही परिस्थिती हलाखीची होती. तसेच यांच्यावरच त्यांची कुटुंबे अवलंबून होती. अचानक त्यांच्या मृत्यूने सामाजिक क्षेत्रातून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत मचाले व अन्य एकाने पवने कुटुंबियांना आर्थिक मदत केली. अनेक हात पुढे सरसावत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCrime Newsगुन्हेगारी