शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या जाहीर झाल्या, जिल्हा परिषद निवडणुका कधी ? मोर्चेबांधणीस अवधी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:17 IST

आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका २६ जानेवारीनंतर होतील, असे मानले जात आहे.

बीड : नगर परिषदांच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजेल अशी अपेक्षा असताना सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने महानगर पालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका २६ जानेवारीनंतर होतील, असे मानले जात आहे. ही सवड मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामांना प्रशासकीय मान्यता व टेंडरच्या प्रक्रियेला बराच अवधी मिळणार आहे. 

बीड जिल्हा परिषदेत मार्च २०२२ पासून प्रशासक आहे. त्याआधीच्या मावळत्या जिल्हा परिषदेत अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. त्याआधीचे अडीच वर्षे भाजपचा प्रभाव होता. गेल्या तीन-चार वर्षांत राज्यातील राजकीय स्थित्यंतरे घडली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांत विभागली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपसाेबत सत्तेत आहे. त्यामुळे महायुतीचे घटक म्हणून धनंजय मुंडे व पंकजा मुंडे सोबत आहेत. याशिवाय इतर सामाजिक व राजकीय बदलांमुळे आगामी निवडणुकीत गतवेळच्या समीकरणात बदलाचा अंदाज आहे. त्यादृष्टीने राजकीय मोर्चेबांधणी पक्षीय पातळीवर सुरू झाली आहे.

२०१६ मध्ये जिल्हा परिषदेचे ६० गट होते. पुनर्रचनेनंतर यंदा ६१ गट आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ६१ राहणार आहे. यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी लोकसंख्या व आरक्षणाच्या सूत्रानुसार अनुसूचित जातीसाठी आरक्षित सदस्य संख्या ८ आहे. अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सदस्य संख्या १ आहे. एकूण सदस्य संख्येच्या २७ टक्के आरक्षणाच्या ओबीसीसाठी १६ जागा निश्चित करण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या ६१ जागांपैकी स्त्रियांसाठी ५० टक्के आरक्षित जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती ८, अनुसूचित जमाती १, ओबीसी १६ अशा सर्व प्रवर्गांमधून एकूण ३१ महिला असतील.

तालखेड, केसापुरीसह ८ गट असतील आरक्षितजिल्हा परिषदेत अनुसूचित जातींसाठी तालखेड, केसापुरी, तेलगाव, होळ, पाटोदा ममदापूर, पिंप्री (बु), मोहा, जिरेवाडी हे आठ गट आरक्षित असणार आहेत. यात होळ, तेलगाव, पाटोदा ममदापूर आणि जिरेवाडी गट अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित आहेत.

२६ जानेवारी की मार्चनंतर?महानगरपालिकांची निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. त्यानंतर फेब्रुवारी-मार्चदरम्यान दहावी-बारावीच्या परीक्षा आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता असल्याने या निवडणुका अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर एप्रिलमध्ये होतील, असाही तर्क लावला जात आहे.

गतवेळच्या मावळत्या जिल्हा परिषदेतील बलाबलराष्ट्रवादी काँग्रेस - २३भाजप- २०सुरेश धस गट -५काकूनाना विकास आघाडी -३काँग्रेस- १शिवसंग्राम -४शिवसेना - ४

प्रमा, टेंडरची लगबगजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने डीपीसीमधून केल्या जाणाऱ्या कामांच्या याद्या लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाकडे देण्यात आल्याचे समजते. त्यानुसार प्रशासकीय मान्यता देण्यास गती आली आहे. तर टेंडर प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी म्हणून प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. सध्या जिल्हा परिषदेत दररोज कामांबाबत कार्यवाहीसाठी येणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Municipal Elections Announced, When Will Zilla Parishad Elections Be Held?

Web Summary : With municipal elections declared, Zilla Parishad elections are expected post-January 26th. Political maneuvering intensifies amidst changing alliances. Restructuring increases seats to 61, with reservations for various categories, including women. Focus shifts to pending development works approvals.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूकBeedबीड