शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे बहिण-भाऊ बिनविरोध पण दोघांच्या पॅनलमध्ये चुरसीचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2023 19:22 IST

एकूण 34 जागे पैकी दोन जागा बिनविरोध निघाल्याने 32 जागेसाठी सहा मे रोजी मतदान होणार आहे

- संजय खाकरेपरळी (बीड) : माजी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली असली तरी इतर जागांसाठी निवडणूक होणार आहे. या दोघांचे चुलत भाऊ व आ. धनंजय मुंडे पॅनलचे उमेदवार अजय मुंडे यांना व माजी राज्यमंत्री पंडितराव दौंड यांच्यासह इतर दिग्गजांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. विषेध म्हणजे, दोघे बहिण-भाऊ बिनविरोध निवडून आले असले तरी आता दोघांच्या पॅनलमध्ये चुरशीची लढत होणार आहे.  निवडणुकीच्या रिंगणात आहे. 

जवाहर एज्युकेशन  सोसायटीच्या संचालकपदाच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी एकूण बारा जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. एकूण 34 जागे पैकी दोन जागा बिनविरोध निघाल्याने 32 जागेसाठी सहा मे रोजी मतदान होणार आहे, सहाय्यक सभासद गटात एका जागे करिता तर तहहयात गटातील  31 जागेसाठी निवडणुक होत आहे. 

सहाय्यक सभासद गटात एका जागेसाठी 3 उमेदवार तर तहहयात गटातील  31 जागेसाठी 67 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे  दोन पॅनलमध्ये निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज  मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी हितचिंतक सभासद गटातून एका जणांनी तर तहहयात गटातून 11 जणांनी आपले 26 उमेदवारी अर्ज मागे घेतले. या गटात एकूण 93 उमेदवारी अर्ज दाखल होते त्यामुळे आता 67 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत तर सहाय्यक गटात एका जागेसाठी तिघांचे उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत  त्यामध्ये कुंडलिकराव मुंडे,अजय मुंडे,रविंद कांदे यांचा समावेश आहे. 

तर आश्रयदाता सभासद गटातून आमदार धनंजय मुंडे तर हितचिंतक सभासद गटातून माजी मंत्री पंकजा मुंडे या बिनविरोध निवडून आले आहेत. तहहयात गटातील 11 जणांचे 26 उमेदवारी अर्ज मागे घेतले. तरुणांना संधी द्यायला हवी अशी प्रतिक्रिया परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापतीबंकटराव कांदे यांनी दिली. 

दिग्गज निवडणूक रिंगणातजवाहर एज्युकेशन सोसायटीच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी माजी राज्य  मंत्री पंडितराव दौंड ,ज्येष्ठ नेते प्रा टीपी मुंडे ,एस टी महामंडळाचे माजी संचालक फुलचंद कराड, जवाहर एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव दत्तापा इटके ,माजी मंत्री धनंजय मुंडे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ अजय मुंडे यांच्या सह इतर उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. उमेदवारांची अंतिम यादी 20 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येऊन चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून द.ल. सावंत हे काम पाहत आहेत त्यांना ललित बोंडे यांचे सहकार्य लाभत आहे.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीड