शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

स्त्री भ्रूण हत्येचा कारखाना उघडलेल्या मुंडे दांपत्याला सक्त मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 16:12 IST

न्यायालयाने सर्व दोषींना १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. 

ठळक मुद्दे२०१२ मध्ये अवैध गर्भपात करताना अतिरक्त स्त्रावाने महिलेचा झाला होता मृत्यू मुंडे हॉस्पिटलमध्ये विना परवाना ६० रूम्ससह ११० बेड आढळून आली होती

बीड : राज्यभर गाजलेल्या परळी येथील अवैध गर्भपात प्रकरणात आज बीड जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणात न्यायालयाने डॉ. सुदाम मुंडे यांना दोषी ठरवले आहे. तसेच डॉ. मुंडेची पत्नी सरस्वती मुंडे आणि पिडीतेचा पती महादेव पटेकर हे सुद्धा यात दोषी आढळून आले आहेत. न्यायालयाने डॉ. मुंडे यांनी स्त्री भ्रूण हत्येचा कारखानाच उघडला होता असे मत नोंदवत सर्व दोषींना १० वर्ष सक्त मजुरी आणि ५० हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

हॉस्पिटलमध्ये होत्या ६० रूम्स या प्रकरणात मृत विजयमाला पट्टेकर यांचे नातेवाईक फितूर झाले होते. मात्र कोर्टाने मुंडे याच्या दवाखान्यातून मिळालेली कागदपत्रे, मुंडे हॉस्पिटलची तपासणी केल्या नंतर १० बेडची परवानगी असताना आढळून आलेल्या ६० रूम्ससह ११० बेड आदी परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरली. यावर मुंडे याने स्त्री भ्रूण हत्येचा कारखानाच उघडला होता असे मत नोंदवले. तसेच आरोपी मुंडे दांपत्याने वय जास्त आहे आणि विविध आजार जडलेली आहेत याचे कारण देत शिक्षेपासून केलेला बचाव फेटाळला. मुंडे दांपत्य आणि विजयमाला पट्टेकर यांचा पती आरोपी महादेव पट्टेकर या तिघांना कलम ३१२, ३१४, ३१५, ३१८ तसेच एमटीपी कायद्याखाली १० वर्ष सक्त मजुरी आणि ५० हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील अ‍ॅड.मिलिंद वाघिरकर यांनी दिली.

काय आहे प्रकरण 

धारूर तालुक्यातील रहिवाशी विजयमाला महादेव पट्टेकर या महिलेला चार मुली होत्या. पाचव्यांदा गर्भवती असताना महादेव पट्टेकर याने 17 मे 2012 रोजी त्यांना डॉ सुदाम मुंडे याच्या परळी येथील मुंडे हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला. त्यानंतर जळगाव येथील डॉ राहुल कोल्हे यांच्या रुग्णालयात गर्भलिंग निदान करण्यात आले. यात पाचवे अपत्य मुलगी असायचे निष्पन्न झाल्याने 18 मे 2012 रोजी परळी येथील मुंडे दांपत्याच्या हॉस्पिटल मध्ये विजयमाला यांचा गर्भपात करण्यात आला. या दरम्यान अति रक्तस्त्रावाने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण खूप तापले आणि पोलिसांनी परळी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवध तसेच अवैध गर्भलिंगनिदान चाचणी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास केला असता डॉ. मुंडे याने याआधीही अनेक गर्भपात करून ती अर्भके प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून स्वत:च्या शेतातील पडक्या विहीरीत टाकल्याचे समोर आले. 

टॅग्स :doctorडॉक्टरAbortionगर्भपातCourtन्यायालयjailतुरुंग