शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या व्यापाऱ्याचे बीडमध्ये साडेतीन लाख रूपये लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 18:00 IST

मुंबईच्या एका व्यापाऱ्याचे जालना व बीड येथून उधारी जमा करून आणलेले ३ लाख ४५ हजार रूपये चोरट्यांनी लंपास केले

बीड : मुंबईच्या एका व्यापाऱ्याने जालना व बीड येथील सायकल मार्टधारकांकडून उधारी जमा करून आलेले ३ लाख ४५ हजार रूपये बॅगमध्ये ठेवले. बीड बसस्थानकातील स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी गेल्यानंतर बॅग बाजुला ठेवली. याचवेळी नजर ठेवून असलेल्या चोरट्यांनी पैशांची बॅग लंपास केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

महेंद्र भालचंद्र सहा  (५६, रा.बोरीवली, मुंबई) असे सायकल व्यापाऱ्याचे नाव आहे. सहा हे सायकलचे व्यापारी आहेत. १६ तारखेलाच ते घराबाहेर पडले. जालना येथील सायकल व्यापाऱ्यांकडून उधारी जमा करून ते मंगळवारी बीडमध्ये आले. बीडमधील पाच ते सहा दुकानदारांकडून २ लाख रूपये जमा केले. त्यानंतर ते बीड बसस्थानकासमोरील एका सायकल दुकानात आले. येथे त्यांनी पैसे मोजले. यावेळी त्यांच्याकडे तीन लाख ४५ हजार रूपयांची रक्कम होती.

ही सर्व रक्कम त्यांनी बॅगमध्ये ठेवून पुढे सोलापूरला जाण्यासाठी बसस्थानकात गेले. परंतु बसला वेळ असल्याने ते स्वच्छतागृहात लघुशंकेला गेले. बॅग काही सेकंदासाठी बाजूला ठेवताच चोरट्यांनी ती लंपास केली. हा प्रकार समजताच त्यांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु कोठेच न मिळाल्याने त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोउपनि आर.ए.सागडे हे करीत आहेत.

संशयीत सीसीटीव्हीत कैदबसस्थानकासमोरील दुकानात सहा गेल्यानंतर एक व्यक्ती बाहेर संशयीतरित्या उभा आहे. दुकानातून बाहेर  पडून स्थानकाकडे निघताच चार व्यक्ती त्यांच्या पाठिमागे जातात. हेच चोरटे असण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी व्यक्त केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोउपनि सागडे यांनी याची सर्व माहिती घेतली आहे. लवकरच हा तपास पूर्ण करू, असा विश्वासही सागडे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :ThiefचोरBeedबीडPoliceपोलिसpassengerप्रवासी