शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पाऊस घेऊन आल्या मुक्ताई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:36 IST

संतश्री मुक्ताबार्इंच्या पालखीचे शनिवारी शहरात भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. पालखीमार्गावर उभा रिंगण सोहळा पाहण्याचा अपूर्व आनंद बीडकरांनी घेतला.

ठळक मुद्देसंत मुक्तार्इंच्या पालखीचे बीड नगरीत स्वागत । माळीवेस हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मुक्ताबाई, मुक्ताबाई आदीशक्ती मुक्ताबाई, पांडुरंग हरी, विठुनामाचा गजर करत मुक्ताई नगर येथून पंढरपुरकडे निघालेल्या संतश्री मुक्ताबार्इंच्या पालखीचे शनिवारी शहरात भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. पालखीमार्गावर उभा रिंगण सोहळा पाहण्याचा अपूर्व आनंद बीडकरांनी घेतला. शहरातील माळीवेस भागातील हनुमान मंदिराजवळ पालखी पोहचताच वरुण राजानेही हजेरी लावत स्वागत केले.२७ जून रोजी शहागड येथील गोदावरी नदीत मुक्ताबाई पादुकांना स्नान घातल्यानंतर पालखी सोहळा गेवराईकडे प्रस्थान झाला. तेथे मुक्कामानंतर गुरुवारी २८ जून रोजी गढी येथे पालखीचा पहिला रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर श्रीक्षेत्र नामलगाव येथे मुक्काम करुन २९ जून रोजी पालखी सोहळ्याचा बीड शहरात प्रवेश झाला. अभंग, भजन गात पावली खेळत वारकरी विठुनामात दंग होते.शनिवारी एकादशीमुळे पालखी मार्गावर वारकऱ्यांना फराळाची पाकिटे, राजगिरा लाडू, शाबुदाना चिवडा, फळे, दुध, चहाची व्यवस्था केली होती. मानाच्या अश्वाची पूजा करुन भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. माळीवेस परिसरात हनुमान मंदिरात स्वागताआधी पालखीचा दुसरा रिंगण सोहळा होणार होता. मात्र त्याचवेळी काही भाविकांनी खांद्यावरुन पालखी मंदिरात आणली. तेथे आरती नंतर दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती.यावेळी पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, पंजाबराव पाटील, सुधाकर पाटील,लखन महाराज,विशाल महाराज खोले,विजय महाराज खोले,अमोल महाराज,दीपक,महाराज, हनुमान मंदिर विश्वस्त मंडळाचे शांतीलाल पटेल, चंद्रकांत पाटील, विश्वासराव मनसबदार, अ‍ॅड. संपतराव मार्कड, अ‍ॅड. प्रसाद मनसबदार, सुरेश नहार, लक्ष्मणराव जाधव, रमेश पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते. रात्री ७ ते १० वेळेत मुक्कामी कीर्तन सेवा झाली. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला.पालखी सोहळ्याला ३१० वर्षेसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्याची ३१० वर्ष पूर्ण होत आहेत. ज्या वेळी सुविधांचा अभाव होता, तेव्हा खांद्यावरुन पालखी न्यावी लागत होती. नंतर मात्र लोकश्रयाच्या बळावर सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या.

टॅग्स :BeedबीडAshadhi Ekadashiआषाढी एकादशीReligious programmeधार्मिक कार्यक्रम