शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावातील दोन गुंडावर एमपीडीए कारवाई; हर्सूल कारागृहात रवानगी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 12:02 IST

माजलगाव शहरासह तालुक्यात दहशत माजविणाऱ्या दोन गुंडांवर एमपीडीए कारवाई करण्यात आली

बीड : माजलगाव शहरासह तालुक्यात दहशत माजविणाऱ्या दोन गुंडांवर एमपीडीए कारवाई करून त्यांची औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी गुरूवारी केली.

शेख जहीर शेख कदीर (३४ हनुमान चौक, माजलगाव) व दिपक कांबळे (२६ ब्रम्हगाव ता.माजलगाव) अशी कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. जहीरवर मारामारी, जुगार, धमकी देणे, रस्त्यात अडविणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत तर दीपकविरोधात घरफोड्या, दरोडे, चाकुचा धाक दाखवून लुटणे, अवैध शस्त्र बाळगणे यासारखे गुन्हे दाखल आहेत.

या दोघांविरोधात माजलगाव शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. महाजन यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्फत जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. याला मंजूरी मिळताच दोघांच्याही मुसक्या आवळून त्यांची औरंगाबादच्या हर्सूल कारागृहत रवानगी करण्यात आली. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, सहायक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि महाजन व माजलगाव शहर ठाण्यातील अधिकारी, कर्मचा-यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडArrestअटकPoliceपोलिस