शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

तारूगव्हाण बंधारा कामासाठी गोदावरी नदीपात्रात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:04 IST

बारा गावच्या नागरिकांनी तारूगव्हाण गोदापात्रात धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतक-यांना जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.व्ही.नखाते यांच्या लेखी आश्वसनाने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी मध्यस्थी केली.

ठळक मुद्देशेकडो गावकरी गोदावरी पात्रात : १५ जुलैपर्यंत काम पूर्ण करण्याचे दिले कार्यकारी अभियंत्याने आश्वासन

माजलगाव : तारूगव्हाण गोदावरी नदीवरील बंधाऱ्याचे काम १३ वर्षांपासून प्रलंबित आहे. अत्यंत धिम्यागतीने काम करण्यात येत आहे. ते काम त्वरित सुरू करून या बंधा-यावरील अवलंबून असणा-या गावकऱ्यांचा पाणी प्रश्न त्वरित सोडविण्यात यावा, या मागणीसाठी परिसरातील दहा बारा गावच्या नागरिकांनी तारूगव्हाण गोदापात्रात धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतक-यांना जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.व्ही.नखाते यांच्या लेखी आश्वसनाने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी मध्यस्थी केली.माजलगाव, परळी, पाथरी तालुक्यातील २५ गावच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी तात्कालिन आघाडी सरकारने पाथरी तालुक्यातील तारूगव्हाण, गोदावरी नदीवरील १२३ कोटी रुपयांचे बंधारा बांधकाम १३ वर्षांपूर्वी सुरू केले होते. या बंधाºयातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे पाथरीसह माजलगाव तालुक्यातील जवळपास २५ गावांचा पाणी प्रश्न मिटवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर होते. जवळपास १३ वर्षांपासून बंधाºयाची बांधणी अत्यंत संथ गतीने हे काम सुरू आहे. हा बंधारा पूर्ण होऊन परिसरातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल या अपेक्षेने जवळपास २५ गावांतील शेतकरी चातकाप्रमाणे बंधाºयाचे बांधकाम पूर्ण होण्याची वाट पाहत आहे. परंतु गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ सुस्तावलेल्या अवस्थेत असल्याने हे काम अत्यंत संथपणे सुरू आहे. हे काम गतीने करावी अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.त्यामुळे गावक-यांनी तारूगव्हाण बंधाºयाचे काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी गोदावरी पात्रातच सोमवार, ३ रोजी भर उन्हात धरणे आंदोलनाला सुरु वात केली. दरम्यान यावेळी माजीमंत्री सोळंके, धैर्यशील सोळंके, अमित नाटकर, संतोष देशमुख, अनंतराव डक, बाळासाहेब डाके, अनंतराव नायबळ, गोविंदराव झेटे प्रमुख नेत्यांचे २५ गावचे शेतकरी यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित होते. दरम्यान, या वेळी माजीमंत्री प्रकाश सोळंके, धैर्यशील सोळंके यांनी जलसंपदा अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच आंदोलकांनी ही या कामाच्या दिरंगाईबद्दल अधीक्षक अभियंता नखाते, संबंधित बांधकाम कंत्राटदारास चांगलेच धारेवर धरले.

टॅग्स :BeedबीडgodavariगोदावरीagitationआंदोलनPrakash Solankeप्रकाश सोळंके