शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सासू-सुनेच्या जोडीची कमाल; घराच्या छतावरील भाजीपाला रोपवाटिकेतून लाखोंची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 19:13 IST

कडा येथील महिला शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग 

- नितीन कांबळेकडा (जि. बीड): पाटाभर शेती नसताना उच्चशिक्षित पती-पत्नीने नोकरीच्या मागे न लागता अंगठेबहाद्दर आईच्या मदतीने घराच्या छतावर विविध भाजीपाल्याची रोपे, घरच्या घरी तयार करून रोजगार मिळवला. त्यातून प्रगती साधली. पाच वर्षांत २५ लाख रोपांतून पाच लाखांचे उत्पन्न मिळवत कडा येथील भोजने कुटुंबाने यशस्वी प्रयोग करत आर्थिक प्रगती साधली आहे.

आष्टी तालुक्यातील कडा येथील यमुनाबाई भोजने या अंगठेबहाद्दर असताना मुलाला उच्च शिक्षण दिले. नंतर मुलाचे बी.एड. झालेल्या मनीषा हिच्याशी लग्न लावले. घरी पाटाभर शेती नसताना शेतीविषयी आवड असल्याने संजय भोजने यांनी पुणे जिल्ह्यात रोपे तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटी देत अनुभव घेतला. २०१८ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील भाळवणी येथून कोकोपीठ विकत घेऊन तो ट्रेमध्ये भरून त्यात टोमॅटो, वांगे, मिरची, प्लाॅवर, कोंबी, शेवगा, पपई आदी रोपे घरी आई व पत्नीच्या मदतीने तयार करण्यास सुरुवात केली. यासाठी स्वतंत्र बोअर घेऊन त्याचे पाणी टाकीत सोडून वरच्या वर रोपाला दिले. यातून दरवर्षी ५ लाख रोपे तयार केले जातात. साधारण ४५ दिवसांत हे रोपे तयार होतात. ही रोपे कडा येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील एका दुकानात ठेवून तालुक्यातील शेतकऱ्यांना एक ते दीड रुपयांप्रमाणे विक्री केली जातात. घरच्या घरी रोजगार उपलब्ध केला.

वर्षाला लाखाचे उत्पन्नपती-पत्नी उच्चशिक्षित असताना नोकरीच्या मागे न लागता आईच्या मार्गदर्शनाने हा व्यवसाय उभा केला. पाच वर्षांत २५ लाख रोपे तयार करून त्यांची विक्री करीत ५ लाख रुपये उत्पन्न मिळवले. ५ लाख रोपे तयार करण्यासाठी ४ लाख खर्च येतो. यातून वर्षाकाठी १ लाख रूपये मिळतात.

हक्काचा व्यवसाय उभारावाघराच्या छतावर भाजीपाल्याची रोपे तयार करून घरच्या घरी रोजगार उपलब्ध करीत गावातच विक्री करून यशस्वी प्रयोग केल्याने आर्थिक उत्पन्न चांगले मिळत आहे. तरुणांनी शिक्षण घेतल्यावर लाखो रुपये गुंतवणूक करत नोकरीच्या मागे न लागता हक्काचा व्यवसाय उभारावा, असे आवाहन उच्चशिक्षित मनीषा व संजय भोजने यांनी केले आहे.

टॅग्स :Beedबीडagricultureशेती