शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

बीडमध्ये सीझर प्रसुतीनंतर मातेचा २९ तासांतच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 18:52 IST

नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप 

ठळक मुद्देजिल्हा रूग्णालयातील प्रकाराने खळबळ चिमुकल्याची प्रकृती ठणठणीत

बीड : सिझर होऊन प्रसुत झालेल्या मातेचा अवघ्या २९ तासांतच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडली. यात मातेने जन्म दिलेला चिमुकला सुखरूप आहे. बीडच्या जिल्हा रूग्णालयातील माता मृत्यूने खळबळ उडाली आहे. दरम्यान, नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. 

अश्विनी विष्णू कळसुले (२४ रा.नागझरी ता.बीड) असे या मातेचे नाव आहे. १६ सप्टेबर रोजी अश्विनी यांना सकाळी ९ वाजता जिल्हा रूग्णालयात दाखल केले. १२ वाजेच्या सुमारास त्यांना शस्त्रक्रिया गृहात घेऊन त्यांचे सिझर केले. यावेळी त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर अवघ्या चार ते पाच तासांनी तिच्या छातीत दुखायला सुरूवात झाली. नातेवाईकांनी डॉक्टरांना कळविले. उपचारही करण्यात आले. मात्र, त्यानंतर हा त्रास कमी झालाच नाही. शेवटी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी अंदाजे पाच वाजेच्या सुमारास अश्विनी यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू केल्यानंतर अवघ्या दोन तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी नातेवाईकांनी रूग्णालय परिसरात टाहो फोडला.

दरम्यान, अश्विनीच्या छातीत दुखत असल्याबाबत वारंवार येथील परिचारीका आणि डॉक्टरांना सांगितले होते. मात्र, त्यांनी उपचाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. उपचारात हलगर्जी आणि वेळेवर उपलब्ध न होणाºया डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. याबाबत त्यांनी लेखी कसलीही तक्रार आरोग्य विभागाकडे केली नसल्याचेही समजते.

कुटूंबात पहिल्यांदाच हलला पाळणाअश्विनी यांचे विष्णू यांच्यासोबत ७ मे २०१८ रोजी लग्न झाले होते. त्या गर्भवती राहिल्यावर उखंडा येथे माहेरी आल्या. त्यांची प्रसुती झाल्यावर कळसुले कुटूंब आनंदी होते. मात्र, हा आनंद काही क्षणापुरताच होता. विशेष म्हणजे विष्णू यांना छोटा भाऊ असून तो लहान आहे. पहिल्यांदाच कळसुले कुटूंबात पाळना हालला होता. 

चिमुकल्याची प्रकृती ठणठणीतअश्विनी यांनी एका चिमुकल्याला जन्म दिला आहे. सध्या हे बाळ नातेवाईकांकडे आहे. त्याला वरवरचे दुध पाजले जात आहे. सध्या त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

दोषींवर कारवाई करू माता मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यात आले. मी स्वता: उपस्थित होतो. मृत्यू कशामुळे झाला, प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालावरून समजेल. यात डॉक्टर दोषी असतील तर नक्कीच कारवाई करू.डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

वेळेवर उपचार मिळाले नाहीत प्रसुती झाली तेव्हा बहिण सुखरूप होती. काही तासांनी छातीत दुखायला लागल्यावर डॉक्टरांना बोलविले. मात्र, वेळेवर कोणीच उपलब्ध नव्हते. मृत्यूच्या आगोदर काही तासांनी अतिदक्षता विभागात नेले. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जी केली तसेच वेळेवर उपस्थित न झाल्यानेच मृत्यू झाल. चौकशी करून कारवाई करावी.- गणेश मुळीक, मयत अश्विीनी यांचा भाऊ

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड